Aurangabad Corona : औरंगाबादमध्ये सकाळपर्यंत 55 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Aurangabad Corona Positive Cases) आहे.

Aurangabad Corona : औरंगाबादमध्ये सकाळपर्यंत 55 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 9:58 AM

औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Aurangabad Corona Positive Cases) आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यातच औरंगाबाद शहराला आणखी एक मोठा धक्का मिळाला आहे. शहरात आज (14 मे) सकाळी 8 वाजेपर्यंत आणखी 55 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांचा आकडा 742 वर पोहोचला (Aurangabad Corona Positive Cases) आहे.

औरंगाबादमध्ये आज दिवसाच्या सुरुवातीलाचा 55 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसात औरंगाबादमध्ये 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे.

औरंगाबादमध्ये 15 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. या रुग्णानंतर कोरोनाबाधितांचा आकड्यात काहीशी वाढ होत होती. मात्र गेल्या 20 दिवसात हा आकडा प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठं आवाहन प्रशासनापुढे आहे.

दरम्यान, राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत 25 हजार 922 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 975 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात 5 हजार 125 रुग्ण कोरोनाने बरे झाले आहेत.

औरंगाबादमध्ये 07 दिवसांत 362 वाढले

तारीख   नवे रुग्ण   एकूण रुग्ण

8 मे          99            477

9 मे         30            528

10 मे      50             558

11 मे       69             627

12 मे      26             653

13 मे      35              688

14 मे     55               742

संबंंधित बातम्या :

मुंबई, पुण्यानंतर औरंगाबाद कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, दिवसेंदिवस रुग्ण वाढतेच

Maharashtra Corona Patient | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजारच्या उंबरठ्यावर, मुंबई, पुण्यासह कुठे किती रुग्णांची वाढ?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.