गंगाखेडमध्ये कोरोनाचा रुग्ण, संपर्कात आल्याने परभणीतील 9 जणांसह एकूण 20 जण संशयित

पुणे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने औरंगाबादमधील गंगाखेड तालुक्यात तब्बल 20 संशयितांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे (Corona positive patient in gangapur)

गंगाखेडमध्ये कोरोनाचा रुग्ण, संपर्कात आल्याने परभणीतील 9 जणांसह एकूण 20 जण संशयित
Follow us
| Updated on: Apr 03, 2020 | 4:52 PM

औरंगाबाद : पुणे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने औरंगाबादमधील गंगाखेड तालुक्यात तब्बल 20 संशयितांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे (Corona positive patient in gangapur). यात केवळ गंगापूरमधील 11 जणांचा समावेश आहे. इतर 9 जण परभणीतील आहेत. एकाच ठिकाणी इतके कोरोना संशयित आढळल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. संशयितांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात आणि एकास सेलू येथील रुग्णालयात आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले आहे.

संबंधित कोरोना बाधित रुग्ण गंगाखेड तालुक्यातील रहिवाशी असून तो नोकरीनिमित्त पुणे येथे राहत आहे. कोरोना विषाणूंची लक्षणे दिसून आल्याने संबंधित व्यक्तीला पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, या व्यक्तीची कोरोना चाचणी केली असता त्याला कोरोना विषाणूंची बाधा झाल्याचं 22 मार्चला स्पष्ट झालं. यानंतर त्याच्यावर तात्काळ कोरोना विषाणूंचे उपचार सुरु करण्यात आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह असलेली ही व्यक्ती 13 मार्च ते 15 मार्च दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील  पैठण येथे नाथशष्टी यात्रेत सहभागी झाली होती. यावेळी नातेवाईक असलेले गंगाखेड तालुक्यातील एकाच गावातील 11 जण त्यांच्या संपर्कात आले होते. यावरुन आरोग्य विभागाने बुधवारी संबंधित गावात जाऊन रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 9 जणांसह दिल्ली येथील निझामुद्दीन येथून परतलेल्यांच्या संपर्कात आलेल्या एकास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

एकूण 11 जणांचे स्व्याबचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद शासकीय महाविद्यालयाकडे पाठवले आहेत. त्यांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे हे गाव सध्या आपोआपच लॉकडाऊन झालं आहे. अनेक जणांना होम कोरन्टाईनचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

संबंधित बातम्या : गंगाखेडमध्ये कोरोनाचा रुग्ण, संपर्कात आल्याने परभणीतील 9 जणांसह एकूण 20 जण संशयित

मुंबईतील धोका वाढला, आधी कोळीवाडा, मग धारावी, आता पवई झोपडपट्टीत ‘कोरोना’ रुग्ण

उस्मानाबादमध्ये कोरोनाचा शिरकाव, मुंबईतील ताज हॉटेलमधून गावी आलेला वेटर पॉझिटिव्ह

Corona positive patient in gangapur

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.