वर्ध्यात झाडाखालीच रुग्णालय उभारलं, जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना तपासणी करुनच एण्ट्री

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यासोबत राज्यातही लॉकडाऊनसह जिल्हाबंदी करण्यात आली (Wardha Check post Corona test) आहे.

वर्ध्यात झाडाखालीच रुग्णालय उभारलं, जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना तपासणी करुनच एण्ट्री
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 8:15 PM

वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यासोबत राज्यातही लॉकडाऊनसह जिल्हाबंदी करण्यात आली (Wardha Check post Corona test) आहे. जिल्हाबंदी असूनही अनेकजण इतर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. असाच प्रकार वर्धा जिल्ह्यातही होत आहे. तसेच वर्ध्यातील पुलगाव शहरातील रुग्णालयात उपचारासाठी अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्याच्या सीमेवर पुलगाव येथे ओ पी डी उभारली (Wardha Check post Corona test) आहे.

वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर निंबाच्या झाडाखाली उभारण्यात आलेल्या रुग्णालयात जिल्ह्याबाहेरून प्रवेश करणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यत चालणाऱ्या या ओ पी डीमध्ये तपासणी आणि औषधोपचार केले जात आहेत.

पुलगाव येथील आरोग्य विभागाने हे रुग्णालय चेक पोस्टवर उभारले आहे. पुलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाळ नारलवार यांच्या संकल्पनेतून हे रुग्णालय येथे ऊभारण्यात आले आहे. पुलगाव येथे यवतमाळ, अमरावती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. याशिवाय मुंबई, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिक देखील वर्ध्यात दाखल होत आहेत. त्यामुळे चेक पोस्टवर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.

दिवसात दोन शिफ्टमध्ये चालणारी ही ओपीडी कोरोना नियंत्रणासाठी फायदेशीर ठरते आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अनेकजण उपचारासाठी पुलगाव शहरातील रुग्णालयात येत आहे. उपचारासाठी अनेकजण येत असल्याने रुग्णालयात गर्दी होत आहे. यासाठी चेक पोस्टवर रुग्णालय उभारले आहे. त्यासोबत जे नागरिक कोरोना जिल्ह्यातून पुलगाव परिसरात वाहनांनी येत आहेत. त्यांची वाहने जिल्ह्याच्या सीमेवर थांबवली जात आहेत आणि त्यांना त्या वाहनांना परत पाठवले जात आहे.

एवढंच नव्हे तर या चेकपोस्टवरील रुग्णालयात मुंबई , पुणेसह कोरोनाबाधीत जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना आणि चालकाला सीमेवर ठेवण्यात येत आहे. या नागरिकांच्या नातेवाईकांना संपर्क साधत त्यांना वर्धा जिल्ह्याच्या वाहनाने घरी नेण्याचे सांगण्यात येत आहे आणि कोरोनाबाधित जिल्ह्यातील वाहनाला परत पाठवले जात आहे.

संबंधित बातम्या :

वर्ध्यात कोरोनाग्रस्त महिलेच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित 141 जण क्वारंटाईन, 13 गावं सील

आधी कोरोनाला अडवलं, आता सारीला गाडलं, वर्ध्याचा पॅटर्न भारी

वर्धा : क्लास वन अधिकारी ते कर्मचाऱ्यांकडून सीमोल्लंघन, प्रशासनाकडून कारवाईचा बडगा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.