कोरोना नियंत्रणासाठी पुणे मनपाचा मोठा निर्णय, 1 लाख नागरिकांच्या कोरोना टेस्ट करणार

सातत्याने वाढणारे कोरोना रुग्ण आणि वाढता मृत्यूदर यावर नियंत्रणासाठी पुणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे (Corona Test kits by PMC in Pune).

कोरोना नियंत्रणासाठी पुणे मनपाचा मोठा निर्णय, 1 लाख नागरिकांच्या कोरोना टेस्ट करणार
Follow us
| Updated on: Jun 24, 2020 | 8:43 AM

पुणे : सातत्याने वाढणारे कोरोना रुग्ण आणि वाढता मृत्यूदर यावर नियंत्रणासाठी पुणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे (Corona Test kits by PMC in Pune). पुणे मनपाने 1 लाख नागरिकांची कोव्हिड-19 टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. यासाठी 1 लाख कोरोना चाचणी किट घेण्यात येणार आहेत.

पुणे महानगरपालिका प्रशासनाने कोरोना चाचणीच्या प्रतिकिट 450 रुपये दराने 1 लाख कीटसाठी 4 कोटी 50 लाख रुपयांच्या खरेदीस मान्यता दिली आहे. या किटचा उपयोग फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या, अतिजोखमीच्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या, ह्रदय विकार, फुप्फुस, यकृत मुत्रपिंड विकार, मधुमेह, रक्तदाब विकार असलेल्या, त्याचप्रमाणे केमो थेरपी, एचआयव्ही बाधित, अवयव प्रत्यारोपण केलेले किंवा वयोवृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिलांसाठी करण्यात येईल. त्यांच्यावर तातडीने उपचारासाठी रुग्णालयांमध्ये ही तातडीची चाचणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, पुणे शहरात काल (23 जून) दिवसभरात 467 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. दिवसभरात 273 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. 10 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूही झाला. सध्या शहरात 277 गंभीर रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यात 57 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 153 इतकी झाली आहे. यातील डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 12 हजार 408 आणि ससून रुग्णालयात 745 रुग्ण आहेत. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 4 हजार 680 इतकी आहे. आतापर्यंत पुणे शहरात एकूण 528 मृत्यू झाले आहेत. तर पुणे शहरात उपचारानंतर बरे होणाऱ्यांची संख्या 7 हजार 945 इतकी आहे.

पुणे जिल्ह्यात काल (23 जून) दिवसभरात 820 कोरोना रुग्णांची वाढ झाली. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 16 हजार 851 इतकी झाली आहे. काल जिल्ह्यातील 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृत्यूंची संख्या 617 वर पोहचली आहे.

संबंधित बातम्या :

LIVE: नाशिक शहरातील शासकीय कार्यालय देखील कोरोनाच्या विळख्यात

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाबळींचा नवा उच्चांक, दिवसभरात 248 जणांचा मृत्यू

Corona Updates of Pune 1 lac Corona Test kits

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.