Corona Vaccine | कोरोनाच्या लसीचा फॉर्म्युला चोरण्यासाठी हॅकिंग, रिसर्च लॅब अलर्टवर

सध्या तीन संस्थांना कोरोना वॅक्सिनचा फॉर्म्युला चोरी करण्याची जबाबदारी दिल्याचा आरोप होतो (Corona Vaccine Formula Hacking) आहे.

Corona Vaccine | कोरोनाच्या लसीचा फॉर्म्युला चोरण्यासाठी हॅकिंग, रिसर्च लॅब अलर्टवर
Follow us
| Updated on: Jul 18, 2020 | 11:27 PM

मुंबई : APT9, द ड्यूक्स आणि कोजी बियर या त्या 3 संस्था आहेत. ज्यांनी सध्या (Corona Vaccine Formula Hacking) अमेरिकेन गुप्तचर संस्थांच्या नाकीनऊ आणलं आहे. एकाच वेळेला या तिन्ही संस्था अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा या तिन्ही देशांची झोप उडवत असल्याचा दावा केला जातो आहे. नेमक्या या तिन्ही संस्था कोण आहेत, त्या करतात काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

या तिन्ही संस्था रशियाचे सर्वेसर्वा ब्लादिमीर पुतीन यांच्या हॅकर्स टीम म्हणून ओळखल्या जातात. ज्यांना सध्या कोरोना वॅक्सिनचा फॉर्म्युला चोरी करण्याची जबाबदारी दिली गेल्याचा आरोप होतो आहे.

अमेरिका सध्या जगाची महासत्ता आहे. तर ब्रिटन याआधी जगाची महासत्ता राहिला आहे. मात्र हे दोन्ही देश एखाद्या सायबर संस्थांच्या कारनाम्यांनी हादरवून जावेत, यावरुन रशियन सायबर संस्थांच्या दहशतीची प्रचिती येते. ब्रिटन आणि अमेरिकेनं आपल्या मेडिकल रिसर्च लॅबला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. कारण, हजार किलोमीटर लांब बसलेले रशियन हॅकर्स कधीही वॅक्सिनच्या लॅबवर हल्लाबोल करण्याची भीती त्यांना सतावते आहेत.

आजवर आपण एखाद्या सरकारची गुप्त माहिती हॅक केली जाते, हे ऐकलंय… त्याशिवाय याआधीही लसीचे फॉर्म्युले चोरीला गेल्याचे किंवा चोरीचे प्रय़त्न झाल्याचे अनेक उदाहरणं आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

कोरोनाच्या आधीपासूनच रशियाच्या या हॅकर्स टीम वेगवेगळ्या देशांमधल्या माहितींवर डोळा ठेवत असल्याचा आरोप होतो आहे. या आरोपांनुसार रशियाच्या APT29 या सायबर टीमकडे अमेरिकेन आरोग्य व्यवस्था आणि ऊर्जा विभागावर हेरगिरीची जबाबदारी आहे.

तर कोजी बियर ही संस्था अमेरिकेच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या माहितीवर डोळा ठेवून असते. मात्र कोजी बियरचं वैशिष्ट्य म्हणजे ही संस्था थेट ”केजीबी”ला रिपोर्ट करते. केजीबी ही भारताच्या आयबीप्रमाणेच रशियाची गुप्तचर संस्था आहे. जिच्या हेरगिरीचे अनेक किस्से दंतकथा बनल्या आहेत.

राष्ट्राध्यक्ष होण्याआधी खुद्द ब्लादिमीर पुतीन हे याच केजीबीचे गुप्तहेर होते. म्हणूनच वय सत्तरीच्या आसपास असूनही ब्लादिमीर पुतीन आजही घोडेस्वारी, स्विमिंग सारख्या अनेक गोष्टींमध्ये तरबेज आहेत.

रशियानं मात्र कोरोना लसीच्या हॅकिंगचे आरोप खोटे ठरवलेत. अमेरिकेलाच रशियात सुरु असलेल्या लसींच्या संशोधनात बाधा आणायची आहे. त्यावरुन लक्ष हटवण्यासाठी अमेरिका उलटे आरोप करु लागल्याचा दावा रशियाचा आहे. रशिया आरोप नाकारत असला तरी एप्रिलमध्येच अमेरिकेच्या मेडिकल इन्सिट्यूटवर सायबर हल्ले झाले होते. ज्यामागे रशिया, चीन किंवा उत्तर कोरियाचा हात असल्याचा संशय होता.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

अमेरिकेच्या दाव्यानुसार रशियनं हॅकर्स हे “WellMess” आणि “WellMail” या नावांच्या व्हायरसने शत्रूंच्या कॉम्प्युटर्सवर हल्लाबोल करतात. हे दोन्ही व्हायरस कॉम्प्युटरमधली पूर्ण माहिती काही मिनिटातच हॅकर्सच्या सिस्टिमला देतात. त्यानंतर मूळ कॉम्प्युटरमधल्या फाईल्स करप्ट सुद्धा करुन टाकतात. म्हणजे हे व्हायरस फक्त माहिती चोरत नाहीत, तर ज्यानं ती कष्टानं मिळवली आहे, त्याच्याकडून ती गायब करतात.

कोरोनाची लस म्हणजे बंद पडलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणणारं इंजिन असेल. म्हणून ज्याच्या हाती सर्वात आधी कोरोनाची लस लागेल. त्याच्याच हातात साऱ्या जगाची नस असणार आहे. म्हणून जितकी अहोरात्र मेहनत कोरोनाची लस शोधण्यासाठी होते आहे, तितक्याच उलथापालथी कोरोनाच्या लसीचा फॉर्म्युला चोरण्यासाठी सुद्धा सुरु झाल्या (Corona Vaccine Formula Hacking) आहेत.

संबंधित बातम्या : 

World News | कोरोना रिपोर्टमध्ये फेरफार करणारा डॉक्टर बांग्लादेशात ताब्यात, पैशांच्या लालसेपोटी डॉक्टरचं संतापजनक कृत्य

अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय अखेर मागे

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.