नांदेडहून पंजाबला परतलेल्या आणखी 25 भाविकांना कोरोना, रुग्णसंख्या वाढण्याची भीती
महाराष्ट्रातील नांदेडमधून (Corona Virus In Punjab) परतलेल्या भाविकांनी पंजाबमध्ये चिंता वाढवली आहे.
चंदीगड : महाराष्ट्रातील नांदेडमधून (Corona Virus In Punjab) परतलेल्या भाविकांनी पंजाबमध्ये चिंता वाढवली आहे. बुधवारी पंजाबमध्ये 37 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 25 जण हे महाराष्ट्रातील नांदेडच्या श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथून आलेले भाविक आहेत (Corona Virus In Punjab). नांदेडहून पंजाबमध्ये परतलेल्या 36 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं आहे.
त्याशिवाय, चार जण राजस्थानच्या कोटा येथून आलेले विद्यार्थी आहेत. आरोग्य विभागानुसार, नांदेड येथून आलेल्या या कोरोना पॉझिटिव्ह भाविकांमुळे पंजाबमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Punjab: Pilgrims from Sri Hazur Sahib, stranded in Maharashtra’s Nanded, returned to the state y’day. As of now, around 3613 such pilgrims have returned to the state. Visuals from Bathinda. DC Bathinda says, “2 pilgrims, who returned to Bathinda,have tested positive for #COVID19” pic.twitter.com/vY7Knq4iiM
— ANI (@ANI) April 30, 2020
भटिंडामध्ये बुधवारी सायंकाळी नांदेड येथून आलेले दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यापूर्वी भटिंडामध्ये एकही कोरोना रुग्ण नव्हता. तर, तरनतारनमध्येही नांदेडहून परतलेले पाच जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Virus In Punjab) आसल्याचं समोर आलं आहे. इथेही यापूर्वी एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नव्हता. नांदेडवरुन आलेल्या लोकांमध्ये लुधियानाचे सात, मोहालीचे पाच फरीदकोटचे तीन, होशियारपूरचे तीन, भटिंडाचे दोन, पतियालाचे दोन, कपूरथलाचे दोन आणि संगरुरचा एका आहे.
लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर पंजाबच्या 20 जिल्ह्यांमधील 3,498 शिख भाविक हे महाराष्ट्रातील नांदेडमध्ये अडकून पडले. या भाविकांना बसेसच्या मदतीने पंजाबला परत आणले जात आहे. यापैकी, 2,293 भाविक हे पंजाब सरकारने पाठवलेल्या 64 बसेसमधून त्यांच्या त्यांच्या गावी पोहोचले. पंजाब सरकारने नांदेडला 80 बसेस पाठवल्या होत्या. यापैकी 15 बसेस (Corona Virus In Punjab) अद्याप येणे बाकी आहे.
संबंधित बातम्या :
हे पहिल्यांदाच घडतंय : केरळमध्ये लॉकडाऊन पाळणाऱ्याला सोनं बक्षीस
अटी-शर्ती पाळून अडकलेल्या मजुरांना समन्वयाने राज्यात न्या, केंद्राचा निर्णय
पालघरमधील साधूंच्या हत्येचं राजकारण, आता बुलंदशहरबाबत अमित शाह गप्प का? : खासदार हुसेन दलवाई
Corona : 30 जानेवारी ते 28 एप्रिल, भारतात कसा वाढला कोरोनाचा कहर