Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नर्सच्या कुटुंबातील 5 जणांना कोरोनाचा संसर्ग, नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 97 वर

नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत नवी मुंबईत 97 कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या झाली (Corona patient increase in navi mumbai) आहे.

नर्सच्या कुटुंबातील 5 जणांना कोरोनाचा संसर्ग, नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 97 वर
Follow us
| Updated on: Apr 23, 2020 | 11:16 PM

नवी मुंबई : नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत नवी मुंबईत 97 कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या झाली (Corona patient increase in navi mumbai) आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज (23 एप्रिल) नवी मुंबई महापालिकेस प्राप्त झालेल्या 63 कोरोना चाचण्यांपैकी 51 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 12 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नवी मुंबईतील करोना रुग्णांची संख्या 97 वर पोहोचली (Corona patient increase in navi mumbai) आहे.

नवी मुंबईतील आज कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 3 डॉक्टर आणि एका नर्सचाही समावेश आहे. त्यासोबत नर्सच्या कुटुंबातील 5 जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे. नवी मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नवी मुंबईत 1446 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 97 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर 990 जणांचे अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. तर 359 रुग्णांचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे.

सानपाडामध्ये आज एका नर्सच्या घरातील 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पालिकेतर्फे आज सानपाडा, नेरुळ सीवूड, कोपर खैराने, वाशी, रबाळे परिसरात औषध फवारणी करून कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. हे सगळे रुग्ण एकमेकांना संपर्कात आल्याने सर्वांना लागण झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

नवी मुंबईतील हॉटस्पॉट आणि सर्वाधिक कोरोना रुग्ण वाशी येथे आहेत. बेलापूरमध्ये एका परिवारातील 8 जणांना आणि महापे एमआयडीसीमध्ये एका आयटी कंपनीतील 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

संबंधित बातम्या : 

Corona | कोरोनामुळे रक्तदानात घट, ब्लड बँकांमध्ये रक्ताचा तुटवडा

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 51 वर, मुंबई एपीएमसीतील मार्केट ‘कोरोना हॉटस्पॉट’च्या वाटेवर?

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.