Lockdown | हजारो मजूर पायी चालत गावाला, पुन्हा शहरात येण्यास अनेकांचा नकार
कोरोनाच्या संकटातलं अनेक मजूर पायपीट करत निघालेले हे चित्र सर्वात भयावह (Migrant workers deny to come Again) असं आहे.
नागपूर : देशात लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला मजूरांना बसला (Migrant workers deny to come Again) आहे. ज्या मजुरांशिवाय बरीच कष्टाची कामं होऊ शकत नाहीत. तेच कष्टकरी मजूर लॉकडाऊनमुळे जगण्यासाठी संघर्ष करत होते. आता ते मजूर गावाला परत जायला लागले आहेत. जी शहरं उभी करण्यासाठी मजुरांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं. गेले दीड महिना त्याच शहरात या मजूरांनी मरणयातना भोगल्या. त्यामुळे आता शहरं सोडून चाललेले बहुतांश मजूर पुन्हा यायला तयार नाहीत. मग या मजुरांशिवाय कोरोनानंतर उद्योगांची, विकास कामांची घडी कशी बसवणार? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.
कोरोनाच्या संकटातलं अनेक मजूर पायपीट करत निघालेले हे चित्र सर्वात भयावह (Migrant workers deny to come Again) असं आहे. गेले दीड महिना हे कष्टकरी मजूर आपला जीव मुठीत घेऊन जगत होते. काहींनी मरणाच्या दाढेत आपलं गाव गाठलं तर काहींचा संसार अर्ध्यावरच मोडला.
लॉकडाऊनमुळे अडकलेले विदर्भातील हजारो मजूर आता गावाला निघाले आहेत. कुणी पायपीट करत जात आहे. तर कुणी सायकलनं आपलं गाव गाठण्यासाठी धळपळ करत आहेत. तर कुणी लहान मुलांना घेऊन ट्रकवर जीवघेणा प्रवास करत आहेत. पण यापैकी बहुतांश मजूर आता परत येण्याच्या मानसिकतेत नाही.
मरणाच्या दाढेतून गावाकडे निघालेले हे बहुतांश मजूर आता परत येण्याच्या विचारात नाही. गेले दीड महिना मरणयातना भोगत हे मजूर गावाकडे जाण्याची वाट पाहत होते. या दीड महिन्यात शहरांनी परकं समजल्याची भावनाही अनेकांच्या मनात आहे. जी शहरं उभी करण्यासाठी या मजुरांनी रक्ताचं पाणी केलं. कोरोनाच्या संकटात त्याच शहरांनी त्यांना परकं असल्याची भावना दिली. त्यामुळे आता गावाला निघालेले बहुतांश मजूर परत येण्याच्या विचारात नाही.
आपले काही नेते परप्रांतियांचा कितीही द्वेष करत असले. तरीही कष्टाच्या अनेक कामांसाठी या मजुरांशिवाय पर्याय नाही. याच मजुरांच्या कष्टाने शहरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या, रस्ते तयार झाले आणि बऱ्याच उद्योगांचा गाडा चालला.
कोरोनाच्या संकटानंतर अर्थव्यवस्था आणि उद्योगाला उभारी देण्याचं नियोजन सरकार सध्या करत आहेत. पण गावाला परत चाललेल्या मजुरांशिवाय हे कसं शक्य होणार? हा सुद्धा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच ज्यांच्या कष्टावर हा देश उभा राहिला. संकंटात त्याच कष्टकऱ्यांचा विसर आपल्याला कधीच परवडण्यासारखा (Migrant workers deny to come Again) नाही.
संबंधित बातम्या :
वर्ध्यात कोरोनाचा शिरकाव, 35 वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह
औरंगाबादेत कोरोनाचा हाहा:कार, 24 तासात 37 रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांचा आकडा 545 वर