Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात पेट्रोल-डिझेल विक्री बंद, गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

आजपासून 31 मार्चपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र पाहून पेट्रोल दिले जाणार (Corona Virus Petrol limit) आहे.

पुण्यात पेट्रोल-डिझेल विक्री बंद, गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Mar 25, 2020 | 9:11 AM

पुणे : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्यात जमावबंदीचे (Corona Virus Petrol limit) आदेश दिल्यानंतरही अनेक ठिकाणी वाहनांची तसेच नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा, रत्नागिरी, नाशिक आणि नांदेडनंतर पुण्यातही पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. पुण्यात कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने पुण्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर बंदी लादली आहे. आता केवळ अत्यावश्यक सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांनाच पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या हालचालीवर नियंत्रण आणणे सोपे होणार आहे. पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा बराच वाढला आहे. दुसरीकडे समाधानाची बाब म्हणजे पुण्यात सर्वात पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी काही रुग्ण आता उपचारानंतर बरेही झाले आहेत. ही राज्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. आरोग्य यंत्रणांसोबतच जिल्हा प्रशासन नागरिकांना घरातच ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. गर्दी होऊ न दिल्यास कोरोनाचा संसर्ग लवकर नियंत्रित करता येणार आहे. त्यासाठीच हे काम सुरु असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनीही 23 मार्चपासून 31 मार्चपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र पाहून पेट्रोल दिले जाणार आहे.

नांदेडमध्ये पेट्रोल पंप बंद, नाशिकमध्ये ‘टाकी फुल’ करण्यास निर्बंध

तर कलम 144 असताना रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी (Corona Virus Petrol limit) नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज (24 मार्च) नाशिकमधील सर्व पेट्रोल पंपावर दुचाकीसाठी एकावेळी फक्त 100 रुपयांचं पेट्रोल मिळणार आहे. तर चारचाकी वाहनांसाठी एकावेळी फक्त 1000 रुपयांचे पेट्रोल मिळणार आहे. लवकरच पेट्रोल पंपाबाबत आदेश काढण्यात येणार आहे.

त्याशिवाय नाशिक शहरासह जिल्ह्यात 47 चेक पोस्ट तयार केले आहेत. या ठिकाणी बाहेरुन शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. त्याशिवाय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहनही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केलं आहे.

“मास्क, औषधे आणि सॅनिटायझर बनवणाऱ्या अनेक कंपन्यांना कलम 144 म्हणजे जमावबंदीतून वगळलं आहे. यामुळे इतर सर्व कंपन्या बंद होणं अपेक्षित आहे,” असेही ते म्हणाले.

नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. यावेळी त्यांच्याशी पुढच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा झाली, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले

खाजगी वाहनांवरही बंदीचा विचार

दरम्यान राज्यात जमावबंदीचे आदेश देऊन 24 तासही उलटले नसताना मुंबई-पुण्यातील अनेक लोक कामानिमित्ताने बाहेर पडले. त्यामुळे अनेक टोलनाक्यांवर वाहनांची प्रचंड वाहनांची गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर लवकरच खाजगी वाहनांवर बंद घालण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यताही नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

“जर नागरिकांनी आवाहनाला दाद दिली नाही, तर कायदा आपलं काम करेल. पोलिसांची तसेच प्रशासनाची विनंती ऐका नाहीतर जबरदस्ती केली जाईल. जर कलम 144 चा भंग केलात तर कलम 188 नुसार पुढील 6 महिने कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे,” असेही नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणाले.

“नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंत 294 कोरोना संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. यातील 54 जणांना कोरोना कक्षात दाखल होते. यातील 53 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर एक अहवाल अद्याप बाकी (Corona Virus Petrol limit) आहे.”

संबंधित बातम्या :

EXCLUSIVE | विनंती झाली, आता हिसका दाखवा, गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

टवाळखोर बाईकस्वारांना नागपूर पोलिसांनी नाकाबंदीला जुंपलं, पुणे पोलिसांनी टी शर्ट उतरवले

कस्तुरबा रुग्णालातून 8 रुग्णांना डिस्चार्ज, आणखी 4 रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर

दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.