Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाताला काम नाही, भुकेला अन्न नाही, लेकराबाळांसह पायपीट करत असंख्य कुटुंबीय गावाला रवाना

सरकार आज काही देत नाही मग काय मरणानंतर देणार का? असा उद्विग्न सवाल मध्यप्रदेशकडे निघालेल्या व्यक्तीने विचारला (Many Worker move to village)आहे.

हाताला काम नाही, भुकेला अन्न नाही, लेकराबाळांसह पायपीट करत असंख्य कुटुंबीय गावाला रवाना
Follow us
| Updated on: Mar 29, 2020 | 11:28 PM

भिवंडी : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 21 दिवसांकरिता लॉकडाऊनची (Many Worker move to village) घोषणा करण्यात आली आहे. देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर त्या ठिकाणी घरात थांबून राहावे असे आवाहन पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबियांची परवड सुरु झाली आहे. काम नसल्याने कामगारांचे मालक त्यांना पैसे देत नाही. त्यामुळे खायचे कसे या विवंचनेत असलेल्या कुटुंबियांनी वाहतूक सेवा बंद असतानाही लेकराबाळांसह पायपीट करत घराकडची वाट धरली आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडघा नजीक (Many Worker move to village) महामार्गावर असे असंख्य कुटुंबीय सापडले होते. यातील अनेक जण काम नसल्याने मालक पैसे देण्यास तयार नसल्याने निराश झाले आहे. या ठिकाणी जगायचे कसे या विवंचनेत कोणी बुलडाणा, अमरावती तर कोणी थेट 500 किलोमीटर अंतरावरील मध्यप्रदेशातील घराकडे निघाले आहेत.

नेवाळी कल्याण येथे मोलमजुरी करणारे कुटुंब रणरणत्या उन्हात अंगाला चटके लागू नये म्हणून अंगावर एकावर एक कपडे चढवून मार्गक्रमण करीत होते. सरकार आज काही देत नाही मग काय मरणानंतर देणार का? असा उद्विग्न सवाल मध्यप्रदेशकडे निघालेल्या व्यक्तीने विचारला आहे.

या रस्त्यावर असे असंख्य कुटुंबियांचे तांडे पाहायला मिळत आहे. यातील कोणी पनवेल तर कोणी अंबरनाथ येथून लहान मुले तर पाच सात वर्षांची मुले उन्हात अनवाणी रडत या मार्गाने पायपीट करत आहे. तर आपल्या डोक्यावर आपल्याजवळील कपड्यांची बोचकी घेऊन आपल्या गावाच्या ओढीने निघाले (Many Worker move to village) आहेत.

भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.