Corona : गोव्यात 3 एप्रिलनंतर एकही नवीन रुग्ण नाही, इतर राज्यांची परिस्थिती काय?

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 11,933 वर पोहोचली आहे. तर 1,344 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत.

Corona : गोव्यात 3 एप्रिलनंतर एकही नवीन रुग्ण नाही, इतर राज्यांची परिस्थिती काय?
Follow us
| Updated on: Apr 16, 2020 | 12:28 AM

नवी दिल्ली : जगभरात आतापर्यंत 20 लाखाहून जास्त लोकांना (Corona Virus Update) कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 लाख 20 पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आरोग्य मंत्रालयानुसार, भारतात कोरोनाबाधितांची संख्या 11,933 वर पोहोचली आहे (Corona Virus Update). तर 1,344 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत. तर 392 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, भारतातील गोवा या राज्यातून एक आनंदाची बातमी येत आहे. गोव्यात कोरोना विषाणूचा सहावा रुग्णही बरा झाला आहे. आता गोव्यात फक्त एक कोरोनाबाधित रुग्ण आहे आणि 3 एप्रिलनंतर गोव्यात एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्रीन प्रमोद सावंत यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेच

महाराष्ट्र : भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित हे महाराष्ट्रात आहे. मुंबई आद कोरोनाचे 183 नवीन रुग्ण आढळून आले. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत 1936 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 113 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सध्या 2916 कोरोनाबाधित आहेत. तर राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 187 जणांचा मृत्यू झाला आहे.

आंध्र प्रदेश : आज सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात कोरोनाचे 23 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाचे 525 रुग्ण आहेत, तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

तेलंगाणा : आज 6 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत 514 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये आज 22 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले (Corona Virus Update). यापैकी 4 प्रकरणं हे जम्मूमधील आहेत आणि 18 काश्मीरची आहेत. सर्व 22 रुग्ण हे कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात होते. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे 300 रुग्ण आहेत. यापैकी 54 रुग्ण हे जम्मूतील तर इतर 246 हे काश्मीरमधील आहेत.

कर्नाटक : आज राज्यात 2 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 279 वर पोहोचली आहे. तर 80 कोरोनाबाधित हे बरे झाले आहेत आणि 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेश : आज हिमाचल प्रदेशात 115 जणांची कोरोना चाचणी झाली. यापैकी 23 जणांची चाचणी निगेटिव्ह आमि तर 92 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. राज्य सध्या कोरोनाबाधितांची संख्या 33 आहे. यापैकी 12 जण बरे झाले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पश्चिम बंगाल : राज्यात गेल्या 24 तासात 12 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 132 वर पोहोचली आहे तर 7 जणांचा कोरोनामुळे (Corona Virus Update) मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra corona update | रुग्णांची संख्या 3 हजारांजवळ, कुठे किती कोरोना रुग्ण?

देशभरात 1,344 जणांची कोरोनावर मात, 10,197 रुग्णांवर उपचार सुरु, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.