Unlock-4 : थिएटर उघडण्याच्या मोदी सरकारच्या हालचाली, मेट्रोही धावण्याची शक्यता, अनलॉक 4 मध्ये काय सुरु होणार?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली मेट्रो ट्रेन पुन्हा एकदा धावण्याची शक्यता आहे

Unlock-4 : थिएटर उघडण्याच्या मोदी सरकारच्या हालचाली, मेट्रोही धावण्याची शक्यता, अनलॉक 4 मध्ये काय सुरु होणार?
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 10:59 AM

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली मेट्रो ट्रेन (Unlock-4 Metro May Start) पुन्हा एकदा धावण्याची शक्यता आहे. अनलॉक-4 मध्ये केंद्र सरकार मेट्रोबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाची देशातील परिस्थिती पाहून यावर अखेरचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय, शाळा-कॉलेज उघडण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने शाळा कॉलेज उघडण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपवल्याची माहिती आहे. त्याशिवाय, केंद्र सरकार थिएटर आणि बार उघडण्याबाबतही निर्णय घेण्याची शक्यता आहे (Unlock-4 Metro May Start).

देशात 30 लाख 44 हजार 941 नागरिकांना कोरोना

कोरोना प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. देशात एकूण 30 लाख 44 हजार 941 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 56 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जनजीवन आणि देशातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबवली जात आहे. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 1 सप्टेंबरपासून देशात अनलॉक 4 सुरु होणार आहे.

अनलॉक -4 मध्ये काय सुरु आणि काय बंद?

सरकार थिएटर सुरु करण्याची परवानगी देऊ शकते

1 सप्टेंबरपासून थिएटर सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकार देणार असल्याची माहिती आहे. मात्र, मॉल्समधील थिएटर उघडण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नव्या स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरची घोषणा केली आहे.

अनलॉक-4 मध्ये बार उघडण्याची शक्यता

अनलॉक-4 मध्ये आतापर्यंत बंद ठेवण्यात आलेले बार उघडण्याची शक्यता आहे. मात्र, इथे बसून मद्यपान करण्याची परवानगी नसेल. तर, मुंबईतही 1 सप्टेंबरपासून बार उघडण्यासाठी परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

प्रायोगिक तत्त्वावर मेट्रो सेवा पुन्हा सुरु होणार

दिल्लीमध्ये 1 सप्टेंबरपासून 15 दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर मेट्रो सेवा पुन्हा सुरु करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या काळात फक्त 50 प्रवाशांना मेट्रोच्या एका बोगीमध्ये प्रवेश करता येणार आहे. तर मुंबईतही 1 सप्टेंबरपासून मेट्रो पुन्हा धावण्याची शक्यता आहे (Unlock-4 Metro May Start).

मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आलेली आहे. पण अद्याप अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

शाळा-कॉलेज उघडणार की नाही?

शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपावण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील शाळा-कॉलेज बंद आहेत. 1 सप्टेंबरपासून शाळा-कॉलेज सुरु करण्यास परवानगी मिळू शकते. मात्र, शाळा-कॉलेज सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारकडे सोपवला आहे.

देशात 24 तासात 69 हजार 239 नव्या रुणांची भर

भारतात गेल्या 24 तासांमध्ये देशात 69 हजार 239 नव्या रुणांची नोंद झाली असून 912 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, देशात एकूण 30 लाख 44 हजार 941 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 56 हजार 706 रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे, असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

Unlock-4 Metro May Start

संबंधित बातम्या :

राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन हटवा, अन्यथा 10 ऑगस्टनंतर कधीही रस्त्यावर उतरुन कायदा हातात घेऊ, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

Pune | पुणेकरांनो, हॉटेल-मॉलमध्ये जाताय? हे नियम वाचून घ्या

Unlock-3 Guidelines | ‘अनलॉक-3’च्या गाईडलाईन्स जारी, देशात काय सुरु, काय बंद?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.