मुंबई : ‘कोरोना व्हायरस’ने जगभरात थैमान घातल्याने अमेरिकेसारख्या महासत्तेपासून भारतातील लहानशा खेड्यापर्यंत अनेकांना फटका बसला आहे. बहुतांश देश लॉकडाऊन स्थितीमध्ये आहेत. जगभरात कालच्या दिवसात (6 एप्रिल) कोरोनाचे 5 हजारांहून अधिक बळी गेले आहेत. अमेरिकेत एकाच दिवशी 1200 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई-पुण्यापासून अमेरिका-इटलीपर्यंत कुठे काय स्थिती आहे, याचा हा आढावा (Corona Worldwide Latest Update)
जगात काय स्थिती?
-जगभरात सोमवारी 5 हजार 208 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
-जगभरातील एकूण कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा 74 हजार 635 वर
-जगभरात कालच्या दिवसात कोरोनाचे 72 हजार नवे रुग्ण समोर
-जगात आतापर्यंत एकूण 13 लाख 44 हजार कोरोनाग्रस्त
अमेरिकेत कोरोनाचा कहर कायम
-अमेरिकेत पुन्हा एक हजाराहून अधिक ‘कोरोना’बळी
-सोमवारी 1 हजार 243 कोरोना रुग्णांनी घेतला अखेरचा श्वास
-अमेरिकेत एकूण बळींचा आकडा 10 हजारांच्या पुढे
-अमेरिकेत एकूण 10 हजार 859 कोरानाग्रस्त दगावले
-सध्या अमेरिकेत सर्वाधिक 3 लाख 66 हजार 112 कोरानाग्रस्त रुग्ण
युरोपीय देशांमध्ये कोरोनाची स्थिती
-फ्रान्समध्ये झपाट्याने कोरोनाचा फैलाव
-आतापर्यंत फ्रान्समध्ये 98 हजार कोरोनाग्रस्त
-फ्रान्समध्ये कालच्या दिवसात 833 रुग्णांचा मृत्यू
-फ्रान्सचा एकूण बळींचा आकडा 8 हजार 911 वर
-इटलीत कालच्या दिवसात 636 रुग्णांचा मृत्यू
-इटलीत एकूण 16 हजार 523 रुग्णांचा मृत्यू
-स्पेनमध्ये कालच्या दिवसात 700 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू
-जर्मनीने एकूण मृत्यू 1 हजार 810 वर रोखले
-जर्मनीत एकूण कोरोनाग्रस्त रुग्ण 1 लाख 3 हजार 375
ब्रिटनचे पंतप्रधान ICU मध्ये
-ब्रिटनमध्ये कालच्या दिवसात 439 रुग्णांचा मृत्यू
-ब्रिटनच्या पंतप्रधानांना ICU मध्ये हलवले
-बोरीस जॉन्सन कालपासून हॉस्पिटलमध्ये, विषाणूचा प्रभाव वाढल्याने ICU मध्ये
-जॉन्सन यांची 11 दिवसांपूर्वीच टेस्ट पॉझिटिव्ह
-ICU मध्ये हलवण्यापूर्वी कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा
चीनमध्ये काल ‘कोरोना’बळी नाही
-चीनमध्ये पहिल्यांदाच एखाद्या दिवशी कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू नाही
-एएफपी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेची माहिती
-चीनमध्ये एकूण 3 हजार 331 ‘कोरोना’बळी
-चीनमध्ये एकूण 81 हजार 740 जणांना कोरोनाची लागण
-चीनमध्ये तब्बल 77 हजार 167 कोरोनाग्रस्त ठणठणीत
-चीनमध्ये कोरोनाची लागण असलेले सध्या केवळ 1 हजार 242 रुग्ण
-चीनमध्ये कोरोनाची लागण असलेले 211 जण सध्या गंभीर
China reports no new #Coronavirus death for the first time: AFP news agency
— ANI (@ANI) April 7, 2020
भारतात रुग्ण वाढतेच
-भारतात कोरोनाबळींचा आकडा 132 वर
-देशात काल 16 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
-देशभर कोरोनाग्रस्तांची संख्या 4,757 वर
-सोमवारी 479 नव्या रुग्णांची भर
महाराष्ट्रात फैलाव वाढला
-देशभरात महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका
-महाराष्ट्रात कोरोनाबळींची संख्या 52 वर
-महाराष्ट्रात काल कोरोनाचे 8 रुग्ण दगावले
-राज्यात 868 लोक कोरोनाबाधित
मुंबईत एकाच दिवशी चौघे दगावले
-मुंबईत 526 जणांना कोरोनाची लागण
-मुंबईत कालच्या दिवसात चौघा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू
-मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे 34 बळी
-मुंबईत कालच्या दिवसात 70 हून अधिक कोरोनाग्रस्त सापडले
पुण्यातही प्रादुर्भाव वाढतोय
पुण्यात काल कोरोनाचे 41 नवे रुग्ण
पुण्यातल्या रुग्णांची संख्या 141 वर
141 पैकी चौघे सध्या अत्यवस्थ
पुण्यात विलगीकरणातल्या 1 हजार 423 पैकी 1 हजार 296 अहवाल निगेटिव्ह
(Corona Worldwide Latest Update)