कुटुंबाचा प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाची गुढीपाडव्याच्या दिवशीच आत्महत्या
सोलापूर : गुढीपाडव्याच्या मंगलदिनीच प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ही घटना आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास बार्शीतील राऊत तलावाच्या पाठीमागील भागात असलेल्या झाडावर या प्रेमी युगलांनी गळफास घेतला. त्यांच्या प्रेमाला घरातून विरोध असल्याने मागील 10 दिवसांपासून दोघेही घरातून बेपत्ता होते. मागील दहा दिवसांपासून पोलीस आणि कुटुंबीय या दोघांचा शोध घेत […]
सोलापूर : गुढीपाडव्याच्या मंगलदिनीच प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ही घटना आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास बार्शीतील राऊत तलावाच्या पाठीमागील भागात असलेल्या झाडावर या प्रेमी युगलांनी गळफास घेतला.
त्यांच्या प्रेमाला घरातून विरोध असल्याने मागील 10 दिवसांपासून दोघेही घरातून बेपत्ता होते. मागील दहा दिवसांपासून पोलीस आणि कुटुंबीय या दोघांचा शोध घेत होते. यामध्ये मृत प्रेयसी ही अल्पवयीन होती. त्यामुळे पोस्को कायद्यांतर्गत प्रियकरावर अपहरणाचा गुन्हा देखील दाखल झाला होता.
त्यानंतर घरातील होणाऱ्या विरोधामुळे अल्पवयीन प्रेयसी आणि सज्ञान प्रियकराने आपले जीवन संपवल्याचे बोलले जात आहे. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी अशी घटना घडल्यामुळे संपूर्ण बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.