नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित ‘तब्लिगी जमाती’च्या कार्यक्रमामुळे ‘कोरोना’संसर्गाचा वेग दुप्पट झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 374 वर गेला आहे. (COVID-19 cases doubling Tablighi Jamaat program)
भारतातील कोरोना फैलावाचा वेग वाढण्यास तब्लिगी जमातीचा कार्यक्रम जबाबदार असल्याचं आकडेवारीमुळे सिद्ध होत आहे. सात दिवसांऐवजी चार दिवसातच रुग्ण दुप्पट होऊ लागल्याने ‘तब्लिगी कनेक्शन’ स्पष्ट होत आहे.
केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, दिल्लीतील ‘तब्लिगी जमाती’च्या कार्यक्रमामुळे कोरोना व्हायरसच्या केसेस वाढल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा सध्याचा काळ 4.1 दिवस इतका आहे, मात्र तब्लिगीचा कार्यक्रम नसता तर 7.4 दिवस इतका कालावधी अपेक्षित होता.
COVID-19 cases doubling in 4.1 days presently, had Tablighi Jamaat incident not happened it would have taken 7.4 days: Health Ministry
— Press Trust of India (@PTI_News) April 5, 2020
गेल्या चोवीस तासात ‘कोरोना’चे 472 नवे रुग्ण आढळले असून या कालावधीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यातील तिघांसह महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे. भारतात आतापर्यंत 79 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर 267 कोरोनाबाधित उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत.
हेही वाचा : सोनिया गांधी, प्रतिभा पाटील ते ममता बॅनर्जी, स्टॅलिन… ‘कोरोना’लढ्यासाठी पंतप्रधानांची दिग्गजांना फोनाफोनी
13.6 लाख कामगारांना त्यांचे मालक किंवा उद्योगामार्फत निवारा आणि भोजन दिले जाते, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी दिली.
सरकारकडून 23,924, तर 3,737 स्वयंसेवी संस्थांकडून अशी भारतभरातील सर्व राज्यांमध्ये 27,661 मदत शिबिरे आणि निवारे स्थापित करण्यात आले आहेत . 12.5 लाख नागरिक त्यांच्यामध्ये आश्रय घेत आहेत. अशाचप्रकारे सरकार आणि एनजीओंकडून 19,460 अन्नछत्रांची सोय करण्यात आली आहे.
Total 3374 confirmed #COVID19 cases reported in India till now; an additional 472 new cases reported since yesterday. Total 79 deaths reported; 11 additional deaths have been reported since yesterday. 267 persons have recovered: Lav Aggarwal, Joint Secy, Health Ministry pic.twitter.com/Uk60Z8S3MI
— ANI (@ANI) April 5, 2020