इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि संक्रमणावरून केद्राचा राज्यांना इशारा, नेमका धोका काय?

केंद्र सरकारने राज्यांना इन्फ्लूएंझा (Influenza) सारखे आजार आणि तीव्र श्वसनाचे आजर Respiratory Infection) यावर ठोस उपाय करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि संक्रमणावरून केद्राचा राज्यांना इशारा, नेमका धोका काय?
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्याकडून राज्यांना अलर्टImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 5:59 PM

मुंबई : आशिया आणि युरोपच्या काही भागांमध्ये कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) पुन्हा वाढीचा धोका संभाव्य आहे, यावरूनच केंद्र सरकारने राज्यांना इन्फ्लूएंझा (Influenza) सारखे आजार आणि तीव्र श्वसनाचे आजर Respiratory Infection) यावर ठोस उपाय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरून कोणतीही प्रारंभिक लक्षणं दुर्लक्षित होणार नाहीत आणि कोविड नियंत्रणात राहील. इन्फ्लूएंझा-सदृश आजार (ILI) आणि श्वसन संक्रमण (SARI) केसेसची तपासणी हे सरकारसाठी कोविड रोखण्याचे मुख्य अस्त्र आहे. अलीकडेच त्याच्या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत कारण भारतात कोरोनाचा जोर सध्या कमी झाला आहे. मात्र काही देशात पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. गेल्या तीन कोरोनाच्या लाटांनी देशासह जगाच्या नाकी नऊ आणले होते. त्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर आहे.

आरोग्य सचिव काय म्हणाले?

निरिक्षण ठेवण्याचा एक भाग म्हणून ILI आणि SARI मुळे पीडित रूग्णालयात भरती झालेल्या रुग्णांची कोविड चाचणी केली जाईल. तसेच नमुने जीनोम तपासणीसाठी पाठवले जातील. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी एका पत्रात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविडचे सतर्क केले आहे, त्यांनी INSACOG नेटवर्ककडे पुरेशा प्रमाणात चाचण्या केल्या जातील याची खात्री करण्यास सांगितले आहे. आर्थिक आणि सामाजिक घडी पुन्हा बसवताना जागरुकता न सोडण्यावर त्यांनी भर दिला. भूषण यांनी पत्रात म्हटले आहे की अशा केसेसे नवीन क्लस्टर्स निदर्शनास येत असल्यास, प्रभावी देखरेख केली जावी. तसेच ILI आणि SARI केसेसची तपासणी आणि नियमांनुसार निरीक्षण केले जावे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवता येईल.

राज्यांना गाफील न राहण्याच्या सूचना

ते म्हणाले की राज्य यंत्रणेने आवश्यक जनजागृती करावी आणि कोविडच्या सूचनांचे पालन करावे. भूषण यांनी पत्रात म्हटले आहे की, दक्षिण पूर्व आशिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये कोविडमध्ये झालेली वाढ पाहता, 16 मार्च रोजी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये राज्यांनी काही महत्वपूर्ण बाबींचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच गाफील न राहता परिस्थित वेगाने हाताळावी.

Raju Shetti महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?; 5 एप्रिलच्या मेळाव्यात घेणार निर्णय

तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखे वागत आहेत, माझ्यावरील संकट आघाडी निर्मित-दरेकर

Sharad Pawar यांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झालीय, रावसाहेब दानवे यांचं टीकास्त्र

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.