Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणेंना भेटून सांगतो, जरा तुमच्या पोराला आवरा, आडाम मास्तर भडकले

नारायण राणे माझे चांगले मित्र आहेत. मी मुंबईला गेल्यावर नारायण राणेंना भेटून सांगतो, तुमच्या मुलाला आवरण्याचा प्रयत्न करा'. मुस्लीम समाजाविरोधात इतकं विष ओकणं बरं नाही,अशा शब्दांत नरसय्या आडम यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंना झापलं.

नारायण राणेंना भेटून सांगतो, जरा तुमच्या पोराला आवरा, आडाम मास्तर भडकले
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 10:30 AM

सोलापूर | 30 जानेवारी 2024 : ‘ सागर बंगल्यावर माझा बॉस बसलाय…त्यामुळे पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही’, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं. त्यांच्या विधानाचा माकप नेते नरसय्या आडम यांनी जोरदार समाचार घेतला. ‘नारायण राणे माझे चांगले मित्र आहेत. मी मुंबईला गेल्यावर नारायण राणेंना भेटून सांगतो, तुमच्या मुलाला आवरण्याचा प्रयत्न करा’. मुस्लीम समाजाविरोधात इतकं विष ओकणं बरं नाही. मुस्लीम समाज हा देखील भारताचा नागरिक आहे. देशात हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्रित संघर्ष केल्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे, अशा शब्दांत नरसय्या आडम यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंना झापलं.

माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम हे सोमवारी दुपारी सोलापुरातील आशा वर्करच्या आंदोलनात सहभागी झाले होते. भाषणानंतर नरसय्या आडम यांनी माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणेंना समज देण्याचा प्रयत्न केला. सोलापुरातील माळशिरसमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चात बोलताना नितेश राणे यांनी चिथावणीखोर भाषण केलं. त्यांच्या भाषणावर आडम यांनी कडाडून टीका केली.

राज्यात बॉस कोणी नाही, तसे असेल तर फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना नितेश राणे यांनी वादग्रस्त आवाहन केलं होतं. पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर दोन चापटा मारून या, तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही. एकच फोन आला पाहिजे. नितेश साहेब कार्यक्रम केलाय आता आम्हाला वाचवा, कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला सुखरूप घरी पोहोचविण्याची जबाबदारी आमची असणार. पोलिसांसमोर बोलतोय. माझं काही वाकडं होणार नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, असं नितेश राणे म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावर आडम मास्तरांनी संताप व्यक्त केला.

हे राज्य म्हणजे जंगल राज्य आहे का ?

हे राज्य म्हणजे जंगल राज्य आहे काय ? देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासोबत पाच वर्षे आमदार म्हणून काम केलंय. फडणवीसांनी कधी अशा शब्दांचा किंवा वाक्याचा उपयोग केला नाही. भाजपचे आमदार नितेश राणे बेताल वक्तव्य करत असतील तर फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल. बॉस कुणाला म्हणतात ? गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये बॉस असतो, अशी टीका आडम मास्तर यांनी केली.

प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रात सर्व जागा लढवू नये, इंडिया आघाडीत यावं : नरसय्या आडम

वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्व जागा लढविणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी माढ्यात म्हटलं होतं. यावर माजी आमदार नरसय्या आडम यांनी आंबेडकरांनी सर्व जागा लढू नये, अशी विनंती केली आहे. इंडिया आघाडीमध्ये राहून आपल्या ताकदीप्रमाणे जागा वाटप करून घ्यावे, अन्यथा मोदींना रान मोकळं मिळेल. देशातील घटना वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना सन्मानाने इंडिया आघाडीत सामावून घ्यावे आणि जागा वाटप करून घ्यावे, अशी विनंती आडम मास्तर यांनी केली आहे.

दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, 'आता जे होईल ते...'
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, 'आता जे होईल ते...'.
पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीजवळ ठोकले पत्रे
पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीजवळ ठोकले पत्रे.
बँकांची काम असतील तर आजच करून घ्या, पुढील चार दिवस बँका बंद; कारण...
बँकांची काम असतील तर आजच करून घ्या, पुढील चार दिवस बँका बंद; कारण....
आधी ऑफर, आता शेकहँड... विधानसभेत एकनाथ शिंदे-नाना पटोलेंची भेट
आधी ऑफर, आता शेकहँड... विधानसभेत एकनाथ शिंदे-नाना पटोलेंची भेट.
सतीश भोसलेच्या कोठडीत वाढ; आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सतीश भोसलेच्या कोठडीत वाढ; आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
दोन सख्या भावांच्या खुनाने नाशिक हादरलं
दोन सख्या भावांच्या खुनाने नाशिक हादरलं.
फहीम खानचं मालेगाव कनेक्शन, पोलिसांसोबत हुज्जत-दादागिरीचे व्हिडीओ समोर
फहीम खानचं मालेगाव कनेक्शन, पोलिसांसोबत हुज्जत-दादागिरीचे व्हिडीओ समोर.
नागपूर राड्यातील फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा, तपासातून माहिती उघड
नागपूर राड्यातील फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा, तपासातून माहिती उघड.
दिशा सालियनच्या वडिलांचे याचिकेतील गंभीर आरोप काय? कोण येणार गोत्यात?
दिशा सालियनच्या वडिलांचे याचिकेतील गंभीर आरोप काय? कोण येणार गोत्यात?.
भाजपची सत्ता असूनही कबर का हटवली जात नाही? कबरीचं संवर्धन सरकार काढेल?
भाजपची सत्ता असूनही कबर का हटवली जात नाही? कबरीचं संवर्धन सरकार काढेल?.