भारताचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलची क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका 17 वर्षांच्या मुलाला भारतीय संघात स्थान देण्याचा विश्वास दाखवला. | Parthiv Patel

भारताचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलची क्रिकेटमधून निवृत्ती
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 12:05 PM

मुंबई: भारताचा क्रिकेटपटू पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली. गेल्या 18 वर्षांपासून क्रिकेट क्षेत्रात सुरु असलेला प्रवास मी आता थांबवत आहे. हे सांगतान माझे मन भरून आले आहे. त्याचवेळी मी अनेकांचा ऋणीही आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका 17 वर्षांच्या मुलाला भारतीय संघात स्थान देण्याचा विश्वास दाखवला. माझ्या कारकीर्दीत बीसीसीआयने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी आभारी असल्याचे पार्थिव पटेलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Parthiv Patel announces retirement from all forms of cricket)

पार्थिव पटेलने 25 कसोटी सामने आणि 38 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय, भारताकडून दोन ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये खेळण्याची संधीही पार्थिवला मिळाली होती.

पार्थिव पटेलने 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी पार्थिव पटेल हा भारताकडून कसोटी खेळणारा सर्वात तरुण यष्टीरक्षक ठरला होता. त्यावेळी पार्थिव पटेलचे वय 17 वर्षे 153 दिवस इतके होते. त्यानंतरच्या काळात पार्थिव पटेलने समाधानकारक कामगिरी केली. मात्र, 2004 मध्ये महेंद्रसिंह धोनी आणि दिनेश कार्तिकच्या प्रवेशानंतर पार्थिव पटेलला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. 2018 साली पार्थिव पटेल भारतीय संघाकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

त्यानंतर पार्थिव पटेलने ‘इंडियन प्रीमिअर लीग’ आणि स्थानिक क्रिकेटकडे आपला मोर्चा वळवला. 2015 मध्ये पार्थिव पटेलने मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना 339 धावा केल्या होत्या. गेल्यावर्षीही आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याचा समावेश होता. त्याचवर्षी गुजरातच्या संघाला विजय हजारे चषक मिळवून देण्यात पार्थिव पटेलचे मोलाचे योगदान होते. मात्र, यंदाच्या वर्षात पार्थिव पटेलला आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

संबंधित बातम्या:

वडील व्हेंटीलेटरवर, प्रत्येक सामना संपताच पार्थिव पटेलची रुग्णालयाकडे धाव

(Parthiv Patel announces retirement from all forms of cricket)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.