Crime : उधारीने दिलेले पैसे देत नाही म्हणून हत्या, भंडारा शहरातील धक्कादायक घटना
उधारी दिलेले तिनशे रुपये परत देत नसल्याचे कारण देत लाकडी दांडयाने वार करुन एका 48 वर्षीय इसमाचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा शहरात घडली आहे. पैशापुढे जीवाचे महत्वच उरले नसल्याचे पुन्हा या घटनेनं समोर आलंय. सतीश आनंदराव रामटेके असं 48 वर्षीय मृतकाचं नाव असून अमन अनिल सोनेकर या 24 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.
भंडारा : उधारी दिलेले तिनशे रुपये परत देत नसल्याचे कारण देत लाकडी दांडयाने वार करुन एका 48 वर्षीय इसमाचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना भंडारा (Bhandara) शहरात घडली आहे. पैशापुढे जीवाचे महत्वच उरले नसल्याचे पुन्हा या घटनेनं समोर आलंय. सतीश आनंदराव रामटेके असं 48 वर्षीय मृतकाचं नाव असून अमन अनिल सोनेकर या 24 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. भंडारा शहरात चांदणी चौक परिसरातील इंदिरा गांधी वार्डच्या कुंभार टोली येथील दास यांचे लेआऊटमध्ये एक इसम मृत अवस्थेमध्ये पडल्याची माहीती पोलिसांना मिळाली. यावरुन भंडारा पोलीस घटनास्थळी गेले असता मुरलीधर सदाशिव मेश्राम यांचे घराचे कुंपनाला लागून एक व्यक्ती मृतअवस्थेत पडलेला दिसून आला. त्याचवेळी मृतकचा भाऊ दिनेश आनंदराव रामटेके यांने सदर ईसमास ओळखून तो त्याचा भाऊ सतिश आनंदराव रामटेके असल्याचं ओळखून सांगितलं. या प्रकरणी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आलाय.
नेमकं प्रकरण काय?
आरोपीने मृतकास 300 रुपये उधारीने दिले होते. मात्र, त्याला परत माघूनही मृतक सतीश पैसे दयायला तयार नव्हता. अखेर आरोपी अमनने त्याला कुणीही नसलेल्या ठिकाणी बोलावून वाद घातला. यावेळी उधारीचा पैसे देण्याचा तगादा आरोपीने लावाला. मात्र, सतीश पैसे द्यायला तयार नसल्याने झालेल्या वाद विवादात अमनने सतीशची लाकडी दांडयाने वार करत हत्या केली. या प्रकरणी अमन सोनेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या अमन कोठडीत आहे.
पैसे न दिल्याने हत्या
सतीश आनंदराव रामटेके असं 48 वर्षीय मृतकाचं नाव असून अमनने सतीशला 300 रुपये उधारीने दिले होते. मात्र, त्याला परत माघूनही मृतक सतीश पैसे दयायला तयार नव्हता. अखेर आरोपी अमनने त्याला कुणीही नसलेल्या ठिकाणी बोलावून वाद घातला. भंडारा शहरात चांदणी चौक परिसरातील इंदिरा गांधी वार्डच्या कुंभार टोली येथील दास यांचे लेआऊटमध्ये एक इसम मृत अवस्थेमध्ये पडल्याची माहीती पोलिसांना मिळाली. यावरुन भंडारा पोलीस घटनास्थळी गेले असता मुरलीधर सदाशिव मेश्राम यांचे घराचे कुंपनाला लागून एक व्यक्ती मृतअवस्थेत पडलेला दिसून आला. त्याचवेळी मृतकचा भाऊ दिनेश आनंदराव रामटेके यांने सदर ईसमास ओळखून तो त्याचा भाऊ सतिश आनंदराव रामटेके असल्याचं ओळखून सांगितलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी अमन सोनेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या अमन कोठडीत आहे.
इतर बातम्या