लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार, पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा

| Updated on: Oct 28, 2020 | 9:59 AM

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचा वारंवार उपभोग घेणाऱ्या नेवासा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार, पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा
Follow us on

चाळीसगाव : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचा वारंवार उपभोग घेणाऱ्या नेवासा पोलीस ठाण्याच्या (Chalisgaon Rape Case) पोलीस उपनिरीक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा शहर पोलीस ठाण्यात या उपनिरीक्षकावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला (Chalisgaon Rape Case).

समाधान वसंत भाटेवाल असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. ते नेवासा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. समाधान यांनी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारा येथील तरुणीला लग्न करण्याचे आमिष देवून तिच्यावर इच्छेविरोधात नाशिक, चाळीसगाव येथे वारंवार तिचा उपभोग घेतला. त्याशिवाय, नाशिक येथे स्वतंत्र रुम भाड्याने घेऊन तेथे देखील लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केला.

पोलीस उपनिरीक्षक समाधान वसंत भाटेवाल यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी दुसऱ्या मुलीशी लग्नही केले. हा प्रकार उघडकीस आल्यावर तरुणीने जाब विचारला असता तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.

तरुणी या पोलीस उपनिरीक्षकाकडे लग्न करण्याची मागणी करत होती. मात्र, वारंवार तिला त्याने नकार दिला. या विपरीत दुसऱ्या तरुणीशी लग्न उरकून घेऊन तिची फसवणूक केली. म्हणून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कलम 376 आणि 420 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


Chalisgaon Rape Case

संबंधित बातम्या :

भाईचा बड्डे पडला महागात ! बारा मित्रांचे पोलिसांनी वाजवले बारा

नवरात्रीत सोनसाखळी चोरण्यासाठी दिल्लीहून मुंबईत; पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

अंत्यसंस्कारावेळी गळ्यावरील व्रण उघड, सासूच्या हत्येचा थरारक उलगडा