औरंगाबादमध्ये विनामास्क मॉर्निंग वॉकसाठी तोबा गर्दी, जिल्हाधिकाऱ्यांकडून समज

मॉर्निंग बॉकसाठी औरंगाबादच्या गोगाबाबा टेकडीवर हजारो नागरिकांची गर्दी उसळली आहे (Aurangabad Morning Walk).

औरंगाबादमध्ये विनामास्क मॉर्निंग वॉकसाठी तोबा गर्दी, जिल्हाधिकाऱ्यांकडून समज
Follow us
| Updated on: Aug 30, 2020 | 8:10 AM

औरंगाबाद : मॉर्निंग वॉकसाठी औरंगाबादच्या गोगाबाबा टेकडीवर हजारो नागरिकांची गर्दी उसळली आहे (Aurangabad Morning Walk). यावेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विनामास्क वॉक करणाऱ्यांना मास्कचा वापर करण्याची समज दिली (Aurangabad Morning Walk).

जिल्हाधिकाऱ्यांकडून ट्रेकिंग आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये मास्क लावण्याबाबत जनजागृती करण्यात आली. मास्क न वापरताच अनेकजण मॉर्निंग वॉक करत होते. त्यामुळे सुनील चव्हाण यांनी मास्क वापरण्यासाठी जागृती करत सूचक उपक्रम राबवला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल (29 ऑगस्ट) 313 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 17 हजार 537 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 362 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 हजार 911 झाली आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 684 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 690 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 53, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 80 आणि ग्रामीण भागात 84 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, काहीदिवसांपूर्वी ठाण्यात पोलिसांनी गांधीगीरी करत मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची आरती ओवाळली होती. लॉकडाऊनचं उल्लंघन करु नका असं वारंवार सांगूनही काही नागरिक नियमांचं पालन करत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी भर चौकात त्यांची आरती ओवाळत आगाऊ नागरिकांना धडा शिकला होता.

संबंधित बातम्या :

Corona | पुण्यात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या 127 जणांवर गुन्हे, पोलिसांची कारवाई

Lockdown | विरारमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Lockdown : ठाणे पोलिसांची गांधीगिरी, मॉर्निंग वॉक करणाऱ्या आगाऊ नागरिकांची भर चौकात आरती

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.