VIDEO : किक सिनेमाचा थरार प्रत्यक्षात, तरुण थोडक्यात बचावला
अॅम्स्टरडॅम (नेदरलँड) : मुंबईत आतापर्यंत अनेक रेल्वे अपघात तुम्ही पाहिले असतील, अनेकांनी निष्काळजीपणामुळे लोकल ट्रेनमध्ये आपले प्राणही गमावले आहेत. अशाच घटना मुंबईशिवाय जगभरात अनेक ठिकाणी घडत असतात. नेदरलँडमध्येही अशीच रेल्वे अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. सलमानचा किक चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल, त्यामध्ये सलमान समोरुन येणाऱ्या जलद ट्रेनला सहज क्रॉस करतो. अशीच घटना रिअल लाईफमध्ये नेदरलँडमधील […]
अॅम्स्टरडॅम (नेदरलँड) : मुंबईत आतापर्यंत अनेक रेल्वे अपघात तुम्ही पाहिले असतील, अनेकांनी निष्काळजीपणामुळे लोकल ट्रेनमध्ये आपले प्राणही गमावले आहेत. अशाच घटना मुंबईशिवाय जगभरात अनेक ठिकाणी घडत असतात. नेदरलँडमध्येही अशीच रेल्वे अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे.
सलमानचा किक चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल, त्यामध्ये सलमान समोरुन येणाऱ्या जलद ट्रेनला सहज क्रॉस करतो. अशीच घटना रिअल लाईफमध्ये नेदरलँडमधील एका तरुणासोबत घडली.
नेदरलँमधील सँटपूर्ट शहरात ही घटना घडली. सायकलवरुन येणारा एक तरुण रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग करत असताना अचानक समोरुन ट्रेन येते. ही वेळ इतकी धक्कदायक होती की, तो तरुण ही त्यावेळी घाबरला आणि पटापट चालत ट्रॅक क्रॉस करु लागला. मात्र ट्रेन आणि रेल्वे रुळ क्रॉसिंग करत असताना त्या तरुणामध्ये काही इंचाचे अतंर व्हिडीओमध्ये दिसत आहे. थोडा जरी उशीर झाला असता तर त्या तरुणाला आपले प्राणही गमवावे लागले असते.
ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पाहताचक्षणी थरकाप उडवणारा हा व्हिडीओ नेदरलँडच्या एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=3EBoIxs-2q4