रायगड : ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने श्रीवर्धन (Cyclone Nisarga Effect In Shrivardhan) तालुक्यातील सायगाव गवळीवाडी येथे भिंत पडून एका मुलाचा मृत्यू झाला. या नैसर्गिक आपत्तीत जीव गमवावा लागल्याची जिल्ह्यातील ही दुसरी घटना (Cyclone Nisarga Effect In Shrivardhan) आहे.
बुधवारी (3 जून) रायगडला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. या आपत्तीत जिल्ह्यात मोठी वित्तहानी झाली आहे. तर दुपारी 4 नंतर चक्रीवादळ जिल्ह्याबाहेर सरकल्यानंतर जीवितहानी झाल्याच्या दोन घटना समोर आल्या. या वादळात अलिबाग तालुक्यातील बंगले वाडी उमटे येथे एकाचा वीज खांब पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर रात्री उशिरा श्रीवर्धन तालुक्यातही या चक्रीवादळामुळे झालेल्या पडझडीत एका मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
तालुक्यातील सायगाव गवळीवाडी येथील अमर पंढरीनाथ जावळेकर या 16 वर्षाच्या मुलाचा भिंत पडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे (Cyclone Nisarga Effect In Shrivardhan).
अलिबागमध्ये विजेचा खांब पडून एकाचा बळी
चक्रीवादळाच्या जोरदार तडाख्याने अलिबाग तालुक्यात बंगलेवाडी उमटे येथे विजेचा खांब कोसळला. यामध्ये दशरथ बाबू वाघमारे (58) हे जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने तेथे वैद्यकीय मदत पाठवण्यात आली. मात्र उपचारादरम्यान दशरथ वाघमारे यांचा मृत्यू झाला.
पुण्यात घराचं छप्पर उडून वृद्धेचा मृत्यू, अलिबागमध्ये विजेचा खांब पडून एकाचा बळीhttps://t.co/1VyGsQDt2y (प्रातिनिधीक फोटो) #NisargaCyclone
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
Cyclone Nisarga Effect In Shrivardhan
संबंधित बातम्या :
Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळात 7 जणांचा जीव वाचवणारी खिडकी!
Cyclone Nisarga | कोकणात हाहा:कार, आंबा, फणस, सुपारीची झाडं जमीनदोस्त, अनेक घरांची पडझड
सहकार्य करा, रायगडमध्ये 38 तासात परिस्थिती पूर्ववत करु, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचं आवाहन
‘निसर्ग चक्रीवादळाचा फटका, रायगडला विशेष आर्थिक पॅकेज द्या’, अदिती तटकरे मागणी करणार