दादासाहेब फाळके यांचं चित्रपटसृष्टीतील योगदान
त्या काळात त्या चित्रपटातून इतके पैसे मिळाले की त्यांच्याल घरी बैलगाडीभरून पैसे येतं होते.
मुंबई – एखाद्या क्षेत्रात काम करण्यासाठी आजही अनेकांना किती मेहनत आणि धडपड करावी लागते हे आपण पाहतोय. स्वातंत्र्यपुर्व काळात अनेकांनी कमी टेक्नॉलॉजी (technology)असताना देखील आपल्या कामात यश मिळवलं अशी अनेक लोकं आपल्या भारतात आहेत. आज आपण दादासाहेब फाळके (dadasaheb fhalake)यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांनी केलेलं काम आज अनेकांना प्रेरणादायी वाटतं. तसेच स्वातंत्र्यपुर्व काळात त्यांनी देशाला पहिला चित्रपट दाखवला. त्यासाठी त्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं लागलं. त्यांनी चित्रपट निर्मितीसाठी लागणारं सगळं काम लंडनमध्ये शिकून घेतलं. भारताला दिलेला पहिला हरिच्छंद्र (harishchandra) चित्रपट बनवताना त्यांना अधिक संघर्ष करावा लागला. दादासाहेबांचं मुळं नाव धुंडीराज गोविंद फाळके, त्यांनी पहिला चित्रपट तयार करण्यासाठी पत्नीचं सोन गहान ठेवलं होतं.
महिलांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री मिळत नव्हती
स्वातंत्र्यपुर्व काळात अनेकांना चित्रपट ही संकल्पना माहित नव्हती आणि माहित करून घ्यायची कुणाची इच्छा देखील नव्हती असं वाटतंय. कारण त्या काळात एखाद्या चित्रपटातील कामासाठी लोक मिळत नव्हती. एखादे वेळेस पुरूषांच्या भूमिकेसाठी लोक मिळायची. परंतु महिलांच्या भूमिकेसाठी अजिबात लोक मिळत नव्हती. हरिच्छंद्र चित्रपटाच्यावेळी तारामतीच्या भूमिकेसाठी महिला कलाकार मिळत नव्हती. म्हणून दादासाहेब फाळके वेश्या व्यवसाय करणा-या महिलांच्यात गेले होते. तिथं गेल्यानंतर ज्यावेळी दादासाहेबांचं तिथल्या अनेक महिलांशी बोलण झालं. भूमिकेसाठी तयार झालेल्या महिलांनी किती पैसे देणार असं दादासाहेबांना विचारलं, त्यांनतर त्यांनी एक आकडा महिलांना सांगितला, महिलांनी आम्ही तर इतके पैसे एका रात्रीत कमावतो असं उत्तर दिलं होत.
हॉटेलमध्ये मिळाली अभिनेत्री
चित्रपटातल्या भूमिकेसाठी मुलगी मिळेना म्हणून दादासाहेब फाळके परेशान झाले होते. शोधा शोध सुरू असताना ते एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले तिथं त्यांना काही गो-या मुली दिसल्या. त्यांना विचारल्यानंतर त्या चित्रपटातल्या भूमिकेसाठी तयार झाल्या होत्या. त्यातल्या मुलीने तारामतीची भूमिका साकारली होती. त्यांच्या त्या चित्रपटासाठी अभिनेत्री मिळाल्यानंतर त्यांचा संघर्ष संपला नाही.
बैलगाडीभरून पैसे येत होते
दादासाहेब फाळकेंनी चित्रपट तयार करायला सुरूवात केल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागली. तसेच त्यांच्या अनेक चित्रपटांनी थिअटरला चांगली कमाई देखील केली. त्या काळात त्या चित्रपटातून इतके पैसे मिळाले की त्यांच्याल घरी बैलगाडीभरून पैसे येतं होते.