विनामास्क असल्याने दत्तात्रेय भरणेंना 100 रुपये दंड; नियमांचे पालन झालेच पाहिजे : भरणे

| Updated on: Nov 01, 2020 | 8:42 PM

भाषण सुरु असताना अचानक मास्क सटकल्याने राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी 100 रुपये दंड भरला आहे. हा दंड त्यांनी स्व:तहून भरला.

विनामास्क असल्याने दत्तात्रेय भरणेंना 100 रुपये दंड; नियमांचे पालन झालेच पाहिजे : भरणे
Follow us on

पुणे : भाषण सुरु असताना अचानक मास्क सटकल्याने राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी 100 रुपये दंड दिला आहे. हा दंड त्यांनी स्व:तहून दिला. यावेळी त्यांनी इतरांनादेखील मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे सांगत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. एका खासगी दुकानाच्या उद्घाटनासाठी ते इंदापुरात आले होते. (Dattatreya Bharane paid fine of Rs 100 for not wearing mask)

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे एका खासगी दुकानाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यांनी दुकानाचे उद्घाटन केल्यानंतर भाषणाला सुरुवात केली. मात्र, चेहऱ्यावरचा मास्क अचानकपणे निसटल्याने नियमांचे उल्लघन केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी स्व:तहून लासुर्णे ग्रामपंचायतीकडे 100 रुपयांचा दंड भरला. यावेळी भरणे यांनी नागरिकांना कोरोनाबाबतच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच कार्यक्रमात विनामास्क आलेल्या नागरिकांना त्यांनी मास्क  लावण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान, इंदापूरमध्ये अनेक ठिकाणी गर्दी होत असून सोशल डिस्‍टन्सिंगचा फज्जा उडत आहे. इंदापुरात दिवाळीच्या तोंडावर रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

राज्यातील कोरोना चाचणीच्या दरात कपात, नवी किंमत किती?

मुंबईत आवाजावरुन कोरोना चाचणीला सुरुवात, निदान लवकर करणं शक्य

(Dattatreya Bharane paid fine of Rs 100 for not wearing mask)