‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्या भारतातील पहिल्या रुग्णाच्या मुलीलाही लागण

कलबुर्गीत मृत्यू झालेल्या कोरोनाग्रस्ताच्या 45 वर्षीय कन्येचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' आल्याने प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या आहेत. Daughter of Kalburgi Corona Case Positive

'कोरोना'मुळे मृत्यू झालेल्या भारतातील पहिल्या रुग्णाच्या मुलीलाही लागण
Follow us
| Updated on: Mar 16, 2020 | 12:41 PM

बंगळुरु : ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्या भारतातील पहिल्या रुग्णाच्या मुलीलाही या साथीची लागण झाली आहे. कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये 76 वर्षीय वृद्धाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला होता. आता त्यांच्या कन्येचे कोरोना रिपोर्ट्सही पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. (Daughter of Kalburgi Corona Case Positive)

मयत वृद्धाच्या कुटुंबातील तिघांचे अहवाल शनिवारी ‘निगेटिव्ह’ आले होते, परंतु त्यांच्या 45 वर्षीय कन्येचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आल्याने प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कलबुर्गीमधील ‘ईएसआयसी’ हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात चौघा जणांना ठेवण्यात आलं आहे.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचा जिल्ह्यातील एकूण 67 जणांशी संपर्क झाला होता. जिल्हा आरोग्य विभागाने 14 दिवसांच्या तपासासाठी सर्वांना विलग ठेवले आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार मृताच्या मुलाची मुलाखत  घेणाऱ्या चार पत्रकारांनाही ‘आयसोलेशन वॉर्ड’मध्ये ठेवण्यात आलं आहे.

कर्नाटकातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातवर पोहचली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात 37 जणांना लागण झाली असून पुण्यात रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे.

आतापर्यंत देशात 110 जण ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आढळले आहेत. यापैकी 95 जणांवर उपचार सुरु आहेत. दोघांचा मृत्यू झाला असून 13 जण ‘कोरोना’च्या धोक्यातून मुक्त झाले आहेत. (Daughter of Kalburgi Corona Case Positive)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.