कुत्र्याला वाचवणं जिवावर बेतलं, 17 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू, कुटुंबियांवर शोककळा
रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने 17 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना माढा येथे घडली असून कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. (death of 17 year old boy in tractor accident in Madha)
सोलापूर : रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने 17 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना माढा येथे घडली असून कुत्र्य़ाला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. संग्राम कदम असे मृत मुलाचे नाव आहे. तो नुकतीच दहावी वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. (death of 17 year old boy in tractor accident in Madha)
मिळालेल्या माहितीनुसार संग्राम आपल्या घरासमोर लावलेला ट्रॅक्टर शेताकडे घेऊन जात होता. ट्रॅक्टर चालवत असताना अचानाक कुत्रा समोर अल्याने तो गोंधळला. समोर आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.
अपघातात ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. ट्रॅक्टरखाली दबल्याने मुलगा जबर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. पण ट्रॅक्टरखाली दबल्याने त्याला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. शेवटी जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर बाजूला करून मुलाला बाहेर काढण्यात आले. परिसरातील नागरिकांनी त्याला तत्काळ माढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण रुग्णालयात दाखल करण्यास उशीर झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे मृत मुलाच्या कुटुंबियांवर शोककळा आली आहे. परिसरातील नागरिकही धक्क्यात असून सर्वांकडून शोक व्यक्त केला जातोय.
संबंधित बातम्या :
पीकअपच्या भीषण अपघातात दुचाकीस्वारांनी दिला मृत्यूला चकवा, थरकाप उडवणारं CCTV फूटेज
कोल्हापूर- गोवा मार्गावर भीषण अपघात, वैभववाडी करुळ घाटात ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला
उपराजधानी नागपुरात रेल्वे अपघात आणि हत्यांचं सत्र थांबेना
(death of 17 year old boy in tractor accident in Madha)