सोलापुरात राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा कोरोनाने मृत्यू

कोरोना संसर्ग झाल्यामुळे सोलापूरमध्ये एका माजी आमदारांचा बळी गेल्याने एकच खळबळ उडाली आहे (Death of Ex MLA due to Corona Infection).

सोलापुरात राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा कोरोनाने मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 14, 2020 | 1:57 PM

सोलापूर : कोरोना संसर्ग झाल्यामुळे सोलापूरमध्ये एका माजी आमदारांचा बळी गेल्याने एकच खळबळ उडाली आहे (Death of Ex MLA due to Corona Infection). माजी आमदार युनूस शेख यांचा शनिवारीच (13 जून) कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचारही सुरु झाले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा कोरोना विरोधातील लढा अपयशी ठरला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर सोलापूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

युनूस भाई शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार होते. शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जात. कालच त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर तात्काळ त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सोलापूरसह राज्यात खळबळ उडाली आहे.

मागील अनेक दिवसांपासून सोलापूरमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. शनिवारी (13 जून) सोलापूर शहरात कोरोनाचे 41, तर ग्रामीण भागात 6 रुग्ण आढळले. तसेच शहरातील 6 जणांचा, तर ग्रामीण भागातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 1 हजार 659 वर पोहचली आहे. आतापर्यंत सोलापूरमध्ये 143 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असं असलं तरी आतापर्यंत 836 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोण होते युनूस शेख?

युनूस शेख 1969, 1975 आणि 1985 अशा तीन टर्मला सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. 1975 मध्ये शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी युनूस शेख यांना महापौर पदासाठी संधी दिली. स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. 1990 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले. मात्र, 1998 मध्ये सुभाष देशमुख यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यांच्या पश्‍चात 4 मुले, 3 मुली असा परिवार आहे.

दरम्यान, याआधी ठाण्यात देखील राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला (Thane NCP Corporator died due to Corona) होता. त्यांच्यावर 15 दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराला 27 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. याबाबत त्यांनी सोशल मीडियावरही जाहीर केले होते.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसेवेचा वसा घेतलेल्या मला दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली आहे. आपणा सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाच्या पुण्याईने मी लवकरच आपल्या सेवेकरिता पुन्हा रुजू होईन. तोपर्यंत सर्वांनी सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन आपापल्या घरी राहावे ही नम्र विनंती!,” असे आवाहन त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून जनतेला केलं होतं. 15 दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. अखेर 10 जून रोजी त्यांचे निधन झाले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती.

संबंधित बातम्या :

ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, आव्हाडांकडून हळहळ व्यक्त

मिरा भाईंदरमध्ये शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, माजी खासदार-माजी नगरसेवकालाही संसर्ग

धनंजय मुंडे यांना कोरोना, ठाकरे सरकारमधील काही मंत्रीही सेल्फ क्वारंटाईन

संबंधित व्हिडीओ :

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.