100 किलोच्या पोत्याला फाशी देऊन चाचणी, खास दोरखंड मागवले, निर्भयाच्या मारेकऱ्यांचं काऊंटडाऊन सुरु?

देशाला हादरवणाऱ्या निर्भया गँगरेपप्रकरणातील दोषी आरोपींच्या फाशीचं काऊंटडाऊन सुरु (Death penalty to accused of nirbhaya rape case) झालं आहे.

100 किलोच्या पोत्याला फाशी देऊन चाचणी, खास दोरखंड मागवले, निर्भयाच्या मारेकऱ्यांचं काऊंटडाऊन सुरु?
Follow us
| Updated on: Dec 10, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली : देशाला हादरवणाऱ्या निर्भया गँगरेपप्रकरणातील दोषी आरोपींच्या फाशीचं काऊंटडाऊन सुरु (Death penalty to accused of nirbhaya rape case) झालं आहे. सध्या चारही आरोपी दिल्लीतील तिहार जेलमध्ये आहेत. जेलप्रशासनाशी अद्याप सरकारकडून अधिकृत पत्रव्यवहार झालेला नाही. मात्र निर्भयाच्या आरोपींच्या फाशीची (Death penalty to accused of nirbhaya rape case) तयारी सुरु असल्याची चर्चा तिहार जेलमध्ये सध्या सुरु आहे.

आरोपींच्या फाशीपूर्वी डमी किंवा चाचणी घेतली जाते. ती चाचणी तिहार जेलमध्ये घेण्यात आली. शंभर किलो वाळू-रेती भरुन पोत्याला गळफास लावून दोरीची क्षमता तपासण्यात आली.

यामागील उद्देश म्हणजे, दोषींना फाशी देताना, आरोपींच्या वजनाने हा दोरखंड तुटू नये, त्यामुळेच अशी चाचणी घेतली जाते. सहा वर्षांपूर्वी 9 फेब्रुवारी 2013 रोजी संसदेवर हल्ला करणाऱ्या दहशवादी अफजल गुरुला फाशी देण्यात आली होती. त्यापूर्वीही अशी चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी चाचणीदरम्यान दोरखंड तुटला होता.

निर्भया गँगरेप प्रकरणात चार आरोपींना फाशी द्यायची आहे. त्यामुळे हा दोरखंड मजबूत असावा, कोणताही घोळ होऊ नये, म्हणून जेल प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.

बक्सरवरुन दोरखंड मागवला

तिहार जेलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फाशी देण्यासाठीचा दोरखंड हा बिहारमधील बक्सर जेलमधून आणला जाणार आहे. आमच्याकडे 5 दोरखंड आहेत, मात्र तरीही आम्ही बक्सर प्रशासनाशी संपर्कात आहोत. तिथून 11 दोरखंड मागवले जाणार आहेत.

यूपी-महाराष्ट्रातून जल्लाद?

तिहार जेलमध्ये आरोपींना फाशी देण्यासाठी जल्लादची गरज भासेल. जर आवश्यकता असेल तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा बंगालवरुन जल्लाद मागवण्यात येऊ शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आरोपी पवनला तिहार जेलमध्ये हलवलं

निर्भया गँगरेपमधील आरोपी पवनला मंडोली जेल नंबर 14 मधून तिहार जेल नंबर 2 मध्ये हलवण्यात आलं आहे. याच जेलमध्ये निर्भयाचे चारपैकी दोन दोषी अक्षय आणि मुकेशही आहे. तर विनय शर्मा नावाचा दोषी जेलनंबर 4 मध्ये कैद आहे.

जेल नंबर तीन मध्येच फाशीचं तख्त

तिहार जेलच्या कानाकोपऱ्यात सध्या निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याबाबतचीच चर्चा सुरु आहे. पवनला तिहार जेलमध्ये आणल्यापासून या चर्चेला जोर आला आहे. ज्या दिवशी त्याला तिहार जेलमध्ये हलवण्यात आलं, ती रात्र आपली शेवटची आहे, अशी पवनची भावना होती.

जेलप्रशासनाच्या मते, रोहिणी, मंडोली आणि तिहारपैकी तिहारच्या जेल नंबर 3 मध्ये फाशीचं तख्त आहे. तिथे उगवलेलं गवत कापून, जागा रिकामी केली जात आहे.

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.