Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा कहर, जगभरात 3,000 हून अधिक जणांचा मृत्यू, भारतालाही कोरोनाचा धोका

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 3,000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा कहर, जगभरात 3,000 हून अधिक जणांचा मृत्यू, भारतालाही कोरोनाचा धोका
Follow us
| Updated on: Mar 03, 2020 | 11:14 AM

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे (Corona death toll in world). कोरोनामुळे आतापर्यंत 3,000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. चीन व्यतिरिक्त जगभरातील इतर देशांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. इटलीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची अचानक वाढ होऊन 52 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत देखील कोरोनाची दहशत आहे.

दरम्यान, एअर इंडियाच्या ऑस्ट्रियाची राजधानी व्हियेना येथून दिल्लीला येणाऱ्या विमानात एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित विमानातील सर्व क्रू मेंबर्सला 14 दिवस आपल्या घरी वेगळं राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 3,000 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याने सर्वच ठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (2 मार्च) सांगितले, “25 फेब्रुवारी व्हियेना-दिल्ली या विमानातील सर्व क्रू मेंबर्सला 14 दिवसांसाठी आपआपल्या घरात वेगळे राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या विमानातील एका पुरुष यात्रेकरुला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.”

दिल्लीत कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण

देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी (2 मार्च) कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेला पहिला रुग्ण आढळला आहे. याव्यतिरिक्त तेलंगणामध्ये देखील एका व्यक्तीला कोरोना संक्रमण झाल्याचं समोर आलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे, “कोरोना (सीओव्हीआयडी-19) संक्रमणाचा दिल्लीत आणि तेलंगणात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. दिल्लीचा रुग्ण इटलीमध्ये गेला होता आणि तेलंगणातील रुग्ण दुबईला गेला होता.”

कोरोना रुग्णांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचे इतरही तपशील तपासले जात आहेत. आरोग्य मंत्रालयाने दोन्ही रुग्णांची स्थिती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. तसेच दोघांवरही लक्ष ठेवण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

केरळमध्ये कोरोनाचे 3 रुग्ण

भारतात सर्वात आधी केरळमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर केरळमध्ये एकूण 3 रुग्ण सापडले.

कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात 21 आंतरराष्ट्रीय विमानतळांवर 2 हजारहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे. भारत सरकारने तीनवेळा चीनमधील भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणले आहे.

कोरोना व्हायरसची सुरुवात चीनमधील वुहान प्रांतात झाली. यानंतर याचं संक्रमण संपूर्ण चीन आणि आता जगभरात झालं आहे. संशयित रुग्णांसाठी सैन्याच्या आणि आयटीबीपीच्या छावला आणि मानेसर येथील छावणीत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

Corona death toll in world

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.