Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रग्ज चॅट ग्रुपची ‘अॅडमिन’ दीपिका पदुकोण, मॅनेजरची खळबळजनक कबुली

दीपिका या ग्रुपवर ड्रग्जची चौकशी आणि मागणी करायची, असे करिश्माने एनसीबी चौकशीत सांगितले आहे.

ड्रग्ज चॅट ग्रुपची 'अॅडमिन' दीपिका पदुकोण, मॅनेजरची खळबळजनक कबुली
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 6:19 PM

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये आता मोठी नावे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (25 सप्टेंबर) अभिनेत्री रकुल प्रीत सिंहसह दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) मॅनेजर करिश्मा प्रकाश यांना एनसीबीने चौकशीकरिता पाचारण केले होते. या चौकशी दरम्यान दोघींकडूनही अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. ड्रग्ज देवाण-घेवाणीसाठी बनवलेल्या व्हाट्सअॅप ग्रुपची (drug group) ‘अॅडमिन’ दीपिका स्वतः असल्याचे, करिश्माने एनसीबीला सांगितले. यामुळे आता दीपिकाच्या अडचणींत वाढ झाली आहे. (Deepika Padukone Admin of drug chat group claims karishma Prakash)

क्वान टॅलेंट कंपनीशी संबंधित होता हा ग्रुप

क्वान टॅलेंट कंपनी आणि दीपिका (Deepika Padukone) यांच्यात कामाविषयीच्या अपडेट देण्यासाठी हा ग्रुप तयार करण्यात आला होता. परंतु काही कालावधीनंतर ड्रग्जच्या देवाण-घेवाणीसाठी या ग्रुपचा वापर सुरू झाला. या ग्रुपमध्ये दीपिका पदुकोण, जया साहा आणि करिश्मा प्रकाश यांचा समावेश होता. दीपिका पदुकोण स्वतः या ग्रुपची ‘अॅडमिन’ होती. या ग्रुपवर ती ड्रग्जची चौकशी आणि मागणी करायची, असे करिश्माने एनसीबी चौकशीत सांगितले आहे.

जया साहाने चौकशीदरम्यान करिश्माचे नाव घेतले होते. एनसीबीने आधी जया साहाची चौकशी केली होती. या चौकशी दरम्यान तिने अनेक बड्या मंडळींची नावे घेतली असून, या सगळ्यांना सीबीआयने समन्स बजावले आहेत. (Deepika Padukone Admin of drug chat group claims karishma Prakash)

एनसीबीचे समन्स मिळाल्यानंतर सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) काल रात्री मुंबईत दाखल झाली आहे. तिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आपण 26 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे कळवले आहे.

ड्रग चॅटमुळेच अडकली दीपिका

दीपिका आणि श्रद्धा कपूरचे नाव सुशांत सिंहची टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या चौकशीत समोर आले आहे. तर, मॅनेजर करिश्मा प्रकाश सोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅटही (drug group) NCBच्या हाती लागले आहेत. त्या कथित चॅटमध्ये दीपिका करिश्माला विचारते, ‘तुझ्याकडे माल आहे का’? करिश्मा यावर रिप्लाय देते की, ‘हो… पण घरी आहे. मी आता वांद्र्याला आहे. जर म्हणशील तर अमितला विचारते.’ परत दीपिका मेसेज करते. ‘हो प्लीज’. काही वेळानं करिश्मा उत्तर देते, ‘अमित घेऊन येत आहे.’ यावर दीपिका विचारते, ‘हॅश आहे का?’ त्यावर करिश्मा म्हणते की, ‘हॅश नाही गांजा आहे.’

संबंधित बातम्या :

ड्रग्ज प्रकरणात ‘धर्मा प्रोडक्‍शन’चे नाव, निर्माता क्षितीज प्रसादला एनसीबीचा समन्स

karan Johar Party Video : आता करण जोहरच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, ‘शिरोमणी’च्या आमदाराची NCB कडे तक्रार

Bollywood Drugs Case | अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांना एनसीबीचा समन्स

(Deepika Padukone Admin of drug chat group claims karishma Prakash)

'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.