Deepika Padukone | … म्हणून दीपिका पदुकोणच्या हातून ‘आदिपुरुष’ निसटला!

प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊतच्या आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’च्या नायिकेसाठी दीपिका पदुकोणचे नाव पुढे येत होते.

Deepika Padukone | … म्हणून दीपिका पदुकोणच्या हातून ‘आदिपुरुष’ निसटला!
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 11:31 AM

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्याने अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या चर्चेत आली होती. या प्रकरणातून केवळ चौकशीअंती काहीसा दिलासा मिळालेली दीपिका पुन्हा एकदा चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त झाली आहे. शकुन बात्रांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गोव्याला गेलेली दीपिका चित्रीकरण आटोपून मुंबईला परतली आहे. मात्र, या सगळ्या दरम्यान तिच्या हातून एक बिग बजेट चित्रपट निसटला आहे. दिग्दर्शक ओम राऊतच्या (Om Raut) आगामी चित्रपटातून दीपिकाला वगळण्यात आले आहे (Deepika Padukone is Om Raut’s first choice for upcoming Film Adipurush).

प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊतच्या आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’च्या नायिकेसाठी दीपिका पदुकोणचे नाव पुढे येत होते. तसेच या चित्रपटात सीतामातेची भूमिका साकारण्यासाठी ओम राऊत यांची दीपिकालाच पहिली पसंती होती. या दरम्यानच्या काळात दीपिका पदुकोण ‘बाहुबली’ प्रभाससह आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या आगामी दाक्षिणात्य चित्रपटात प्रभास-दीपिकाची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

म्हणून दीपिका ‘आऊट’

ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटातही अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत झळकणार आहे. रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभास ‘आदिपुरुष’ अर्थात ‘राम’ या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकाने ‘सीता’ साकारावी अशी ओम राऊत यांची इच्छा होती. मात्र, दीपिका आणि प्रभास आधीच एका चित्रपटात एकत्र काम करत असल्याने, दीपिकाला या प्रोजेक्टमधून वगळण्यात आले आहे. एकचवेळी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम करता येणार नसल्याने, हा निर्णय घेण्यात आला आहे.(Deepika Padukone is Om Raut’s first choice for upcoming Film Adipurush)

दीपिकाशिवाय अद्याप दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार नाही…

स्पॉटबॉयने आपल्या अहवालात प्रभासच्या जवळच्या सुत्रांचे हवाला देताना असे म्हटले की. ‘या चित्रपटातील ‘सीता’ या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणच्या नावाला ओम राऊतची पहिली पसंती होती. पण प्रभासबरोबर ती आधीच नाग अश्विनच्या आगामी चित्रपटाचे ​​चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात हे दोघे एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे पुन्हा एखाद्या चित्रपटात त्यांना त्वरित एकत्र काम करण शक्य होणार नाही.’

त्याचबरोबर असेही म्हटले जात आहे की, तेलुगु चित्रपटांत काम केलेल्या रकुलप्रीत सिंह, कियारा अडवाणी आणि पूजा हेगडे या अभिनेत्री ‘सीता’ ही भूमिका तितक्या सहजतेने साकारू शकत नाहीत. त्यामुळे या अभिनेत्रींना प्रभाससोबत घेता येणे शक्य नाही. दीपिका पदुकोणच ‘आदिपुरुष’ या चित्रपटासाठी परिपूर्ण निवड होती. दीपिकाशिवाय कोणत्याही अभिनेत्रीचा या भूमिकेसाठी अद्याप विचार करण्यात आलेला नाही.

(Deepika Padukone is Om Raut’s first choice for upcoming Film Adipurush)

हेही वाचा : 

Hollywood Movie: देसी गर्ल प्रियांका पुन्हा हॉलीवूडपटात झळकणार; नव्या सिनेमाची घोषणा

ड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.