Deepika Padukone | दीपिका पदुकोणची ‘काजू कतली’सोबत तुलना, अभिनेत्रीकडून मजेशीर प्रतिक्रिया…

दीपिकाकडून शेअर केल्या गेलेल्या या मीममध्ये दीपिकाच्या आऊटफिटची ‘काजू कतली’शी तुलना केली गेली आहे.

Deepika Padukone | दीपिका पदुकोणची ‘काजू कतली’सोबत तुलना, अभिनेत्रीकडून मजेशीर प्रतिक्रिया...
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 1:57 PM

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे. गेले काही दिवस ती सतत काहीना काही पोस्ट शेअर करत असते. दीपिका नेहमी पती रणवीर सिंह सोबतची खास छायाचित्रे चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच, दिवाळीच्या दिवशी दीपिका आणि रणवीरने आपल्या लग्नाच्या दुसरा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर दीपिकाने काल आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक खास मीम शेअर केले आहे. ज्यामध्ये तिची तुलना ‘काजू कतली’शी (kaju Katli) केली गेली आहे (Deepika Padukone Reaction on kaju katli comparison meme).

दीपिकाकडून शेअर केल्या गेलेल्या या मीममध्ये दीपिकाच्या आऊटफिटची ‘काजू कतली’शी तुलना केली गेली आहे. या फोटोत एका बाजूला ‘काजू कतली’ तर, दुसऱ्या बाजूला ‘काजू कतली प्रो मॅक्स’ असे म्हणत दीपिकाचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. चाहत्यांनाही दीपिकाचा हा अंदाज पाहून आपले हसू आवरता आले नाही. ट्विटरवर दीपिकाची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होते आहे.

जरा इसे भी देखो… दीपिकाची प्रतिक्रिया

दीपिकाचे हा फोटो अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीच्या नुकत्याच झालेल्या दिवाळी पार्टीमधील आहे. ज्यामध्ये दीपिका चंदेरी रंगाचा ड्रेस परिधान करून सहभागी झाली होती. ‘जरा इसे भी देखो’, असे म्हणत दीपिका पदुकोणने हा फोटो शेअर केला आहे (Deepika Padukone Reaction on kaju katli comparison meme).

सिद्धांत चतुर्वेदीची दिवाळी पार्टी

बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीच्या दिवाळी पार्टीमध्ये दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे यांनी हजेरी लावली होती. दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी हे तीनही कलाकार शकुन बत्राच्या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे एक शेड्युल नुकतेच गोवामध्ये पूर्ण करण्यात आले आहे. शकुन बात्रांचा हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दीप-वीरच्या लग्नाचा वाढदिवस

बॉलिवूडची ‘मोस्ट रोमँटिक’ जोडी ‘दीप-वीर’ यांनी नुकताच आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला आहे. दीपिका आणि रणवीरच्या चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी या जोडीला शुभेच्छा दिल्या. याच खास क्षणी रणवीरने ‘माझी बाहुली’ म्हणत दीपिका पदुकोणला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तर, दीपिकानेसुद्धा रणवीरला शुभेच्छा दिल्या होत्या (Deepika Padukone Reaction on kaju katli comparison meme).

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध जोडीने 2018मध्ये इटलीत लग्नगाठ बांधली होती. अनेक कार्यक्रमात नेहमीच ते दोघे एकमेकांसोबत दिसतात. ड्रग्ज प्रकरणी एनसीबी चौकशीदरम्यानदेखील रणवीरने दीपिकाला खंबीर पाठिंबा दिला होता. त्यावेळेसही तो दीपिकासोबत दिसला होता.

(Deepika Padukone Reaction on kaju katli comparison meme)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.