दसऱ्याला पहिलं राफेल भारताला मिळणार, राजनाथ सिंह पॅरिसला रवाना
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh Paris Tour) आज (7 ऑक्टोबर) पॅरिसला जाणार आहेत. तिथे वायु सेना दिनाला भारताला पहिलं राफेल लढाऊ विमान मिळेल (Rafale Aircraft Handover). उद्या (8 ऑक्टोबर) दसरा असल्याने तिथे रजनाथ सिंह राफेल हँड ओव्हर सेलिब्रेशन दरम्यान शस्त्र पुजाही करतील.
नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh Paris Tour) आज (7 ऑक्टोबर) पॅरिसला जाणार आहेत. तिथे वायु सेना दिनाला भारताला पहिलं राफेल लढाऊ विमान मिळेल (Rafale Aircraft Handover). उद्या (8 ऑक्टोबर) दसरा असल्याने तिथे रजनाथ सिंह राफेल हँड ओव्हर सेलिब्रेशन दरम्यान शस्त्र पुजाही करतील. हा कार्यक्रम दक्षिण फ्रान्सच्या बॉगदू (Bordeaux) शहरात आयोजित करण्यात आला आहे. संरक्षणमंत्री यावेळी राफेल विमानात उड्डाण करतील (Rafale Aircraft Handover in Paris). त्यांच्यासोबत आणखी तीन राफेल फायटर्स उड्डाण घेतील. पहिलं राफेल पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत भारतात येईल.
फ्रान्समध्ये राजनाथ सिंह यांची राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी भेट
राजनाथ सिंह मंगळवारी राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतील (Rajnath Singh Paris Tour). त्यानंतर फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांसोबत राजनाथ सिंह डिफेन्स डायलॉग कार्यक्रमात सहभागी होतील,
राफेल सोबत अॅडव्हान्स शस्त्रही मिळणार
भारताला राफेल विमानांसोबत सर्वात अॅडव्हान्स शस्त्रही मिळतील. यामध्ये Meteor आणि Scalp मिसाईल्स असतील, असं युरोपियन मिसाइल निर्माता MBDA ने सांगितलं.
Meteor आणि Scalp मिसाईल्सची वैशिष्ट्य़े काय?
Meteor ला जगातील सर्वात चांगलं बियाँड व्हिजुअल रेंज (BVR) मिसाईल मानलं जातं. हे नेक्स्ट जेनरेशन चं BVR एअर-टू-एअर मिसाईल आहे. यामध्ये अॅडव्हान्स अॅक्टिव्ह रडार सीकर लागलेलं आहे,ज्यामुळे हे मिसाईल कुठल्याही परिस्थितीत काम करु शकतं.
Meteor ने लहान ड्रोन्सपोसून ते क्रूज मिसाईल्स, इतकंच नाही तर सुपरफास्ट जेट्सवरही निशाणा साधला जाऊ शकतो. टू-वे डेटा लिंकच्या माध्यमातून मध्येच टारगेटही बदलता येतं. 190 किलोचं हे मिसाईल 150 किलोमीटरच्या अंतरापर्यंत निशाणा साधू शकतं. यामध्ये 60 किलोमीटरपेक्षा जास्त ‘नो एस्केप झोन’ आहे, म्हणजे या मिसाईलची स्पीड इतकी असेल की 60 किलोमीटर दरम्यान शत्रूला काही समजण्यापूर्वीच त्याचा विनाश झालेला असेल.
SCALP EG ला ब्रिटिश एरोस्पेसच्या मदतीने तयार करण्यात आलं होतं. याला Storm Shadow ही म्हणतात. याची रेंज जवळपास 560 किलोमीटर आहे. यामध्ये लागलेला BROACH वॉरहेड याला आणखी खास बनवतं. हे मिसाईल कुठल्याही लक्ष्यावर निशाणा साधण्यापूर्वी त्याच्या आजू-बाजुच्या जमीनीला साफ करतं. त्यानंतर मुख्य स्फोटकाला ट्रिगर करतं. हे ‘फायर अॅण्ड फॉरगेट’ प्रकारचं मिसाईल आहे. याला एकदा लाँच केल्यानंतर कंट्रोल करता येत नाही.