आईचं कर्ज फेडण्यासाठी एक वर्षाचा बरसू राजधानी दिल्लीत
नवी दिल्ली : कर्जमाफी आणि उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा, या मागणीसाठी देशभरातील शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आपल्या आईवर अससेलं दीड लाखांचं कर्जमाफ व्हावं, या मागणीसाठी आईसोबत एक वर्षाचा बरसूही रामलीलावर आंदोलनात सहभागी झालाय. दिल्लीत शेतकऱ्यांच्या या ऐतिहासिक आंदोलनातला ‘बरसू’ हा सर्वात लहान आंदोलनकर्ता आहे. उत्तर प्रदेशातील बिलासपूरच्या सितारा… घरी शेती […]
नवी दिल्ली : कर्जमाफी आणि उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा, या मागणीसाठी देशभरातील शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आपल्या आईवर अससेलं दीड लाखांचं कर्जमाफ व्हावं, या मागणीसाठी आईसोबत एक वर्षाचा बरसूही रामलीलावर आंदोलनात सहभागी झालाय. दिल्लीत शेतकऱ्यांच्या या ऐतिहासिक आंदोलनातला ‘बरसू’ हा सर्वात लहान आंदोलनकर्ता आहे.
उत्तर प्रदेशातील बिलासपूरच्या सितारा… घरी शेती जेमतेम आहे. वरुन डोक्यावर दीड लाख रुपये कर्जाचा डोंगर आहे. जिथे पोट भरण्यासाठीही शेती पिकत नाही, त्या शेतीतून दीड लांखांचं कर्ज कसं फेडणार? हा सितारा यांच्यापुढचा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच त्या आपल्या एक वर्षांच्या दुधपित्या बरसूला घेऊन शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. दिल्लीची थंडी, वरुन खाण्यापिण्याचं आबाळ… अशा स्थितीत त्या आपल्या एक वर्षाच्या मुलाला घेऊन आंदोलनात सहभागी झाल्यात.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनात बरसू सोबत अनेक लहान मुलं घेऊन त्यांची आई सहभागी झालीय. उत्तर प्रदेशातील उन्नावच्या फुलमती यांच्यावर कर्ज नाही. पण परिसरातील शेतकऱ्यांसाठी त्याही आपल्या तीन वर्षांच्या अंशला घेऊन आंदोलनात सहभागी झाल्यात.
लखनौच्या रोशनी रावत यांच्यावरही पावणेदोन लाखांचं कर्ज आहे. शेतीतून कर्ज फेडू शकत नाही. त्यामुळे आपल्या दोन वर्षांच्या मुलीला घेऊन त्याही या आंदोलनात सहभागी झाल्यात.
देशातील शेतकरी संकटात आहे, आस्मानी संकटं आणि सुलतानी धोरणांमुळे शेतकऱ्यांचं जगणं असह्य झालंय. कर्जबाजारीमुळे देशात अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवलीय. त्यामुळे संकटात सापडलेले शेतकरी आपली लेकरंबाळं घेऊन दिल्लीत दाखल झालेत. आता सरकारने कर्जमाफी करावी आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव द्यावा, हीच देशभरातील शेतकऱ्यांची आशा आहे.
शेतकरी आंदोलनात निवृत्त लष्कर अधिकारी मैदानात
या आंदोलनाला पाठिंबा म्हणून निवृत्त लष्कर अधिकारीही पुढे आलेत. दिल्लीतील या आंदोलनाला पाठिंबा म्हणून निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांनी रामलिलावर हजेरी लावली. या देशासाठी सीमेचं रक्षण करणारा जवान आणि देशाला अन्नसुरक्षा देणारा किसानही महत्त्वाचा आहे, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलोय, असं निवृत्त लष्कर अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचं मत आहे.