Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली, टाटा मोटर्सच्या Nexon EV च्या 2,200 युनिट्सची विक्री

लाँचिंगनंतर केवळ 10 महिन्यांमध्ये टाटा मोटर्सच्या नेक्सॉन ईवी या कारच्या 2 हजार 200 युनिट्सची विक्री झाली आहे.

देशात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली, टाटा मोटर्सच्या Nexon EV च्या 2,200  युनिट्सची विक्री
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 7:49 AM

मुंबई : टाटा मोटर्सच्या नेक्सॉन ईवी (Tata Nexon EV) या कारला भारतीय ग्राहकांची पसंती मिळत आहे. लाँचिंगनंतर 10 महिन्यांमध्ये देशात या कारच्या 2 हजार 200 युनिट्सची विक्री झाली आहे. यावरुन आपण अंदाज लावू शकतो की देशात आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात 1000 नेक्सॉन ईवी रोलआऊट करण्यात आल्या. त्यानंतर गेल्या तीन महिन्यात एक हजार युनिट्सची रेकॉर्डब्रेक विक्री झाली आहे. टाटा मोटर्सने याबाबत म्हटले आहे की, नेक्सॉन ईवी ही देशात सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. (Demand for electric cars increased in the country,Tata Motors sold out 2,200 units of of Nexon EV)

यावर्षी सप्टेंबरमध्ये नेक्सॉन ईवीच्या 303 युनिट्सची विक्री झाली होती. इलेक्ट्रिक कारच्या बाबतीत ही संख्या खूप मोठी आहे. भारतीय बाजारात ईलेक्ट्रिक व्हिकल मार्केटमध्ये नेक्सॉनचा एकूण 61.4 टक्के भाग आहे. या सेगमेंटमध्ये सर्वाधिक पसंती मिळणारी दुसरी इलेक्ट्रिक कार MG ZS EV ही आहे. सप्टेंबमध्ये या कारच्या 127 युनिट्सची विक्री झाली होती.

टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 13.99 लाख रुपये ते 16.25 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार XM, XZ+ आणि XZ + LUX अशा तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. नेक्सॉन ईव्हीच्या XM व्हेरियंटची किंमत 13.99 लाख रुपये आहे, तर XZ+ आणि XZ+ LUX व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 15.25 लाख आणि 16.25 लाख रुपये आहे.

या इलेक्ट्रिक एसयूव्ही मध्ये दिलेलं इलेक्ट्रिक मोटर इंजिन 129PS पॉवर आणि 245Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर टाटा नेक्सॉन 312km पर्यंत धावू शकते. शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात. नेक्सॉनला स्टँडर्ड 15A AC चार्जरने 20 टक्क्यांहून 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 8 तास लागतात, तर फास्ट चार्जरने नेक्सॉनची बॅटरी 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्च करण्यासाठी 60 मिनिटे पुरेशी आहेत. या कारला 8 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी देण्यात आली आहे, तसेच यामध्ये IP67 वॉटरप्रूफ बॅटरी पॅकचा समावेश करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

Hero Optima ते Bajaj Chetak, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात उपलब्ध, किंमत 28 हजार रुपयांपासून सुरु

Renault ची नवी ऑफर, केवळ 1403 रुपयांच्या हप्त्यांवर रेनॉ क्विड घरी घेऊन जा

Mahindra THAR चा मार्केटमध्ये धुमाकूळ, तरीही कंपनी कार बंद करण्याच्या विचारात?

(Demand for electric cars increased in the country,Tata Motors sold out 2,200 units of of Nexon EV)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.