Flood : JEE परीक्षेला सुरुवात, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

विदर्भातील काही भागात पूर आल्यामुळे आजपासून सुरु होणारी JEE आणि नीटची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे (JEE and NEET Exam).

Flood : JEE परीक्षेला सुरुवात, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
Follow us
| Updated on: Sep 01, 2020 | 8:22 AM

नागपूर : विदर्भातील काही भागात पूर आल्यामुळे आजपासून सुरु होणारी JEE आणि नीटची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे (JEE and NEET Exam). पूरग्रस्त भागातील विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा येथे पुरामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यास अडचण निर्माण झाली आहे.  यापार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे (JEE and NEET Exam).

नागपूर खंडपीठात आज (1 सप्टेंबर) 8.30 वाजता विद्यार्थ्यांच्या मागणीवर सुनावणी होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पुरामुळे गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेला येण्यास अडचण निर्माण झाली आहे. JEE आणि ‘नीट’ परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना नागपूर शहरात सेंटर मिळाले आहे.

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचण्यास अनेक अडचणी येत आहेत. युथ काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार यांनीही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

दरम्यान,  JEE आणि नीट परीक्षेला मोठा विरोध विद्यार्थी आणि काही राजकीय पक्षांकडून करण्यात आला होता. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आजपासून ही परीक्षा सुरु होत आहे. JEE 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबरला आहे. नुकतेच सुप्रीम कोर्टाने कोरोना काळात या परीक्षांना अनुमती दिली होती.

संबंधित बातम्या :

NEET-JEE ऐवजी खेळण्यांवर चर्चा, मोदींच्या ‘मन की बात’वर राहुल गांधींची टीका

मोदी सरकारने विद्यार्थ्यांची ‘मन की बात’ ऐकावी, JEE-NEET परीक्षांवरुन राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.