Sucess Story | नैराश्याने शांतता हिरावली, आत्महत्येचे विचार, आत्मविश्वास जिंकला आणि तो IPS झाला
देशातील प्रतिष्ठित आयआयटी दिल्लीतून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. पण, त्याच्या आत्मविश्वास डळमळीत झाला होता. आत्महत्येचे सतत विचार मनाय येत होते. मात्र, त्यांनी त्यावर विजय मिळविला आणि देशातील सर्वात कठीण परीक्षा पास झाले.
जर स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य गोष्टही शक्य होते असे म्हणतात. एका वेब सीरिजच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेले आयपीएस अधिकारी अमित लोढा यांची जीवनकहाणी काहीशी अशीच आहे. अनेक नक्षलवादी टोळ्यांचा खात्मा करणारे आयपीएस अमित लोढा यांच्याही आयुष्यात अशी एक वेळ आली होती. नैराश्याला बळी पडून ते स्वतःचे जीवन संपवायला निघाले होते. सतत आत्महत्येचा विचार मनात येत होता. पण, त्यांनी धैर्य दाखवले. स्वतःचा आत्मविश्वास वाढविला. याच विश्वासाच्या बळावर त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखविले.
आयपीएस अमित यांचे शालेय शिक्षण जयपूरच्या सेंट झेवियर्स स्कूलमधून झाले. त्यांनंतर त्यांनी दिल्लीत आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. आयआयटीमध्ये शिकत असताना अमित यांच्या धाडसाला वाव मिळाला. गणित विषयात त्याची कामगिरी सातत्याने घसरत होती. या खराब कामगिरीमुळे त्यांचे सहकारी दुरावू लागले. त्यांच्याकडून मिळणाऱ्या वाईट वागणुकीमुळे अमित दुखावला. तो हळूहळू डिप्रेशनमध्ये जाऊ लागला. त्यामुळे अभ्यासातील कामगिरी आणखीनच खालावत गेली. पण, त्याने हार मानली नाही. स्वतःवरचा आत्मविश्वास कायम ठेवला. जोमाने अभ्यास केला आणि गणितामध्ये अव्वल आला.
यूपीएससीच्या तयारीदरम्यान अमित लोढा यांनी मुख्य विषय गणित हाच निवडला. ज्या विषयामुळे त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येऊ लागले होते तोच विषय निवडून त्यांनी सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता. अमित यांनी UPSC परीक्षेत गणितात चांगले गुण तर मिळवलेच शिवाय चांगले रँक मिळवून आत्मविश्वास पक्का असेल कुठलेही क्षेत्र लांब रहात नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखविले.
UPSC परीक्षा पास झाल्यांनतर आयपीएस म्हणून ते रुजू झाले. त्यांची कारकीर्द कधी गोड तर कधी आंबट अनुभवांनी पुढे जात होती. 2005 मध्ये त्यांना बिहारमध्ये शेखपुरा या नव्याने तयार झालेल्या जिल्ह्यात पाठवण्यात आले. जिथे त्यांना महातो टोळीशी मोठा सामना करावा लागला. परंतु, अंगी असलेले शहाणपणा आणि शौर्य यामुळे त्यांनी त्या टोळीचा अध्यायच बंद केला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. या टोळीला मंशेष केल्यांनतर बिहारमध्ये त्यांना सुपर कॉप म्हणून ओळखले जाऊ लागले. आज त्यांची गणना बिहारच्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. UPSC उत्तीर्ण करण्यासाठी एक वेळापत्रक बनवले आणि त्याचे पालन करून परीक्षेत यश मिळवले, असे ते सांगतात.