पुण्याला चक्रीवादळाचा तडाखा, अजित पवार थेट बांधावर, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

पुणे जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. या नुकसानग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी (Cyclone Nisarga Ajit Pawar visit Pune) केली.

पुण्याला चक्रीवादळाचा तडाखा, अजित पवार थेट बांधावर, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन
Follow us
| Updated on: Jun 05, 2020 | 4:35 PM

पुणे : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निसर्ग चक्रीवादळाचा फटका (Cyclone Nisarga Ajit Pawar visit Pune) बसला. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये देखील पॉली हाऊसला या निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. पुण्यातील नुकसानग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. या पाहणीत अजित पवारांनी नेमकं किती नुकसान झालं आहे, कशाकशाचे नुकसान झाले आहे याबाबची माहिती घेतली. यानंतर उद्या याबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली जाणार असून त्यात मदत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तब्बल साडेतीनशे ते चारशे एकर मध्ये फुल शेतीची पाहणी केली. यातील पवळेवाडी येथील बुधाजी जोगेश्वर यांच्या गुलाब शेतीची पाहणी करत किती नुकसान झाले आहे हे जाणून घेतले.

या पहाणीच्या दरम्यान नुकसानग्रस्त शेतकरी गोदाजी यांच्या आईने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मदतीसाठी साकडे घातले. मी आजही शेतामध्ये कंबर कसत आहे. तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करण्यासाठी कंबर कसा असे भावनिक आवाहन देखील या वृद्ध आजीने अजित पवार यांच्याकडे केलं.

हरिभाऊ पवळे या शेतकऱ्याला अजित पवारांनी गाडी जवळच बोलावून घेतलं. त्यांचे नेमकं किती आणि कसे नुकसान झाले याची माहिती अजित पवारांनी घेतली. तर उर्वरित शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

मावळ तालुक्यात 350 एकर क्षेत्रावर गुलाब शेती केली जाते. त्यापैकी 200 एकर पॉली हाऊसचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

तर पुढे खेड आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचीही अजित पवारांनी पाहणी केली. या पाहणीनंतर उद्या मदत देण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीत नेमकी किती मदत दिली जाती, याकडे गुलाब शेतकऱ्यांचं लक्ष लागून (Cyclone Nisarga Ajit Pawar visit Pune) आहे.

मुख्यमंत्र्यांकडून रायगड जिल्ह्याची पाहणी

तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्याला तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पंचनामे होतील पण तूर्तास तातडीची मदत म्हणून ही रक्कम देत आहे, इतर जिल्ह्यांनाही मदत केली जाईल, असं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cyclone Nisarga Ajit Pawar visit Pune) म्हणाले.

संबंधित बातम्या : 

रायगडकरांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, तातडीने 100 कोटी जाहीर : उद्धव ठाकरे

PHOTO | चक्रीवादळाचा रायगडला फटका, मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....