आमचा रोहित म्हणतो, ‘काका हे करा, काका ते करा’, अजित पवार पहिल्यांदाच पुतण्याच्या मतदारसंघात

कोणता अधिकारी चिरीमिरी मागत असेल तर त्याचे नाव मला सांगा, मी बघतो त्यांच्याकडे, अशी तंबीही अजित पवारांनी (Ajit Pawar praises Nephew Rohit Pawar) दिली.

आमचा रोहित म्हणतो, 'काका हे करा, काका ते करा', अजित पवार पहिल्यांदाच पुतण्याच्या मतदारसंघात
Follow us
| Updated on: Mar 09, 2020 | 6:30 PM

अहमदनगर : कर्जत जामखेड हा माझा आवडता मतदारसंघ आहे, या तालुक्यांशी माझे भावनिक नाते आहे. रोहित पवार (Ajit Pawar praises Rohit Pawar) यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिल्याने सर्वांचे आभार. आमचा रोहित म्हणतो, ‘काका हे करा, काका ते करा’, अनेक मंत्र्यांना तो भेटतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुतण्या रोहित पवारांवर स्तुतिसुमनं उधळली. पहिल्यांदाच ते पुतण्याचा मतदारसंघ कर्जत-जामखेडमध्ये गेले होते. (Ajit Pawar praises Rohit Pawar)

होळीच्या शुभेच्छा देऊन अजित पवारांनी भाषणाला सुरुवात केली. निवडणुकीनंतर मी पहिल्यांदाच इथे आलो. रोहितला तुम्ही निवडून दिलंत, त्याबद्दल आभार. आता तुमची जबाबदारी संपली आणि आमची सुरु झाली. आम्ही फक्त बोलत नाही, तर करुन दाखवतो, हे सर्वांना माहित आहे. मी तुमच्या आणि रोहितच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली.

श्रीगोंदा मतदारसंघात माजी आमदार राहुल जगताप यांचं ‘होय-नाय’ सुरु असल्यामुळे घनश्याम शेलार यांना उशिरा उमेदवारी दिली. नाहीतर घनश्याम शेलार पण निवडून आले असते. पण राहुल जगताप यांचे वडील असते, तर झटपट निर्णय घेतला असता, असा टोला अजित पवारांनी लगावला. तर राधाकृष्ण विखे पाटलांना सूर्य तिथे उगवेल, असं वाटलं होतं, मात्र तसं झालं नाही, असा टोमणाही अजितदादांनी मारला. महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम असल्याने भाजप खासदार सुजय विखेंना निमंत्रण दिलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मुलींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही, असा कायदा आणत आहोत. पोलिसांना सांगतो कर्जत-जामखेडमध्ये तुमच्यात कोणी हस्तक्षेप करणार नाही. महिलांच्या अत्याचारात वाढ झाली आहे. विधानसभा आणि लोकसभेतही महिलांना आरक्षण द्यावे, अशी मागणी करणार आहे. पण देशात एकमत होणे गरजेचे आहे. देशपातळीवर सीएए, एनआरसी याबाबत खूप बोलले जाते. अनेक मंत्र्यांनी शब्द दिला. मात्र या कायद्याचा महाराष्ट्रात कोणालाही, कोणत्याही समाजाला त्रास होणार नाही, असा शब्दही अजित पवार यांनी दिला.

हेही वाचा : कोरोनाबद्दल अजित पवारांची जागरुकता, प्रत्येक कार्यक्रमात हस्तांदोलन टाळत नमस्कार

मी निवडणुकीच्या काळात येत होतो तेव्हा खड्ड्यांमुळे त्रस्त झालो होतो. तेव्हा वाटायचं हेलिकॉप्टरने यावं. नवा रस्ता बांधून झाल्यावर जर एका पावसात रस्ते खराब झाले, तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येणार. कोणता अधिकारी चिरीमिरी मागत असेल तर त्याचे नाव मला सांगा, मी बघतो त्यांच्याकडे, अशी तंबीही अजित पवारांनी दिली.

‘आता अधिकाऱ्यांना पाच दिवस काम करायचं आहे. त्यामुळे मनापासून काम करा’, असं सांगतानाच ‘शेतकऱ्यांनो वीज बिल भरायला शिका. ‘महावितरण’वर 45 हजार कोटींची कर्ज आहेत, असा सल्लाही अजित पवारांनी दिला. सर्कल अधिकाऱ्यांना सांगतो माझी सटकली तर तुझी वाट लागेल, अशा शब्दात अजित पवारांनी सज्जड दमही दिला.सत्तेची मस्ती, धुंदी आमच्या डोक्यात कधी जाणार नाही, असं वचनही अजित पवार यांनी जनतेला दिलं.

Ajit Pawar praises Nephew Rohit Pawar

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.