‘डेटॉल’ कोरोना व्हायरस रोखू शकतो?
चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू (Dettol Liquid rumors on Coronavirus) झाला आहे.
बीजिंग : चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू (Dettol Liquid rumors on Coronavirus) झाला आहे. जगभरातील डॉक्टर आणि वैज्ञानिक यावर उपाय शोधत आहेत. अशामध्येच आता डेटॉल लिक्विड कोरोना व्हायरस रोखण्याचे काम करु शकतो, अशी अफवा पसरली आहे. डेटॉलने जखम आणि हात साफ करुन कोरोना व्हायरस मारता येऊ शकतो, असं म्हटलं (Dettol Liquid rumors on Coronavirus) जात आहे.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात डेटॉलची अफवा पसरली आहे. या अफवेला उत्तर देण्यासाठी डेटॉल कंपनीला समोर यावे लागले. “लिक्विडच्या माध्यमातून कोरोना व्हायरस रोखणे अशक्य आहे”, असं डेटॉल कंपनीने सांगितले.
“आम्ही इतरांना हा सल्ला देऊ शकत नाही की डेटॉल लिक्विडचा वापर करुन कोरोना व्हायरसवर काही फरक पडेल. डेटॉलने कोरोना व्हायरस ठीक झाला, अशी घटना अजून समोर आलेली नाही”, असंही डेटॉलने कंपनीने म्हटले.
मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरस चीनमध्ये पसरलेला आहे. एकट्या चीनमध्ये 300 पेक्षा अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. सर्व देश आपल्या नागरिकांना चीनमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
चीनमध्ये पूर्णपणे मेडिकल इमरजन्सी घोषित केली आहे. तसेच चीन सरकारने तेथील लग्न कार्यक्रमावरही बंदी आणली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने अनेकांनी आपले पाळीव प्राण्यांना मारुन रस्त्यावर फेकले आहे. हा व्हायरस एवढा भयानक आहे की, चीनच्या रस्त्यावर लोक चालता चालता मरुन पडत आहेत.