Tukaram Mundhe | आयुक्त-नगरसेवक वादामुळे अनेक कामं रखडली, महत्वाची कामं तरी सुरु करावी, स्थायी समिती अध्यक्षांची मागणी
नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला आणि अनेक प्रस्तावित कामांच्या फाईल थांबवल्या.
नागपूर : नागपूर महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध (Development Work In Nagpur) नगरसेवक, असा सामना रंगत आहे. त्याची अनेक कारणं असली, तरी अनेक कामांच्या फाईल्स थांबविण्यात आल्याची ओरड होत आहे. याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होत आहे, असा आरोप आहे (Development Work In Nagpur).
नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला आणि अनेक प्रस्तावित कामांच्या फाईल थांबवल्याचा आरोप आहे. त्यामुळे नागपुरात नगरसेवक विरुद्ध तुकाराम मुंढे, असा संघर्ष पेटला. मात्र, सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, प्रभागात वेगवेगळी छोटी मोठी कामं असतात, कुठे नाली तुटली आहे, कुठे गडरवर झाकण नाही, अनेक रस्ते खराब झाले आहेत. मात्र, या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी पैसेच मिळत नाही, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
सोबतच शहरातील अनेक विकास कामं आहेत, जी थांबविण्यात आली आहेत. त्यामुळे ती अर्धवट पडली आहेत. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे, जी महत्वाची आणि आवश्यक कामं आहे, ती तरी सुरु करावी, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष करत आहेत.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
महापालिकेत अनेक कामं थांबली आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती आधीच बिघडली आहे. त्यात कोरोना सारखी महामारी, त्यामुळे नागरिक हैराण असताना आता साधी कामं सुद्धा होत नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे महापालिकेत फक्त राजकारण सुरु आहे का, असे प्रश्न नागरिक विचारत आहे.
नागपूर स्मार्ट सिटीचे सीईओपद तुकाराम मुंढेंकडून काढले, तीन तासांच्या बैठकीत वादळी चर्चा https://t.co/dNH649mkyp #TukaramMundhe @Tukaram_IndIAS #NagpurSmartCity @gajananumate
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 10, 2020
Development Work In Nagpur
संबंधित बातम्या :
आयुक्त-महापौर वाद शमेना, तुकाराम मुंढेंनी कंत्राटदाराला 18 कोटी कसे दिले? नागपूरच्या महापौरांचा सवाल