वरळी पॅटर्न वगैरे काही नाही, सरकारने बनवाबनवी थांबवावी : देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वरळी पॅटर्नच्या दाव्यावर सडकून टीका केली. तसेच राज्य सरकारने वरळीत लक्षणं नसलेल्या संशयितांच्या चाचण्याही बंद केल्याचा आरोप केला (Devendra Fadnavis criticize Warli pattern).
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वरळी पॅटर्नच्या दाव्यावर सडकून टीका केली. तसेच राज्य सरकारने वरळीत लक्षणं नसलेल्या संशयितांच्या चाचण्याही बंद केल्याचा आरोप केला (Devendra Fadnavis criticize Warli pattern). वरळी पॅटर्न वगैरे काहीही नाही, सरकारने आकड्यांची बनवाबनवी थांबवावी, असं मत त्यांनी व्यक्त केलं. ते टीव्ही 9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आयसीएमआरने आणि केंद्रीय समितीने जे सांगितलं होतं ते लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते कोठेही वरळी पॅटर्न म्हटलेच नाहीत. मात्र, वरळी पॅटर्न देशभरात स्वीकारणार अशा बातमी प्रकाशित करण्यात आल्या. खरंतर वरळी पॅटर्नमध्ये लक्षणं नसलेल्या संशयितांच्या चाचणी पूर्णपणे बंद करुन टाकण्यात आल्या होत्या. वरळीच्या खासगी प्रयोगशाळेत चाचण्या सुरु होत्या. त्या प्रयोगशाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे एकूणच लपवाछपवी करुन आपल्याला कोरोनाचा संसर्ग थांबवता येणार नाही.”
मुंबईत केवळ धारावीत कोरोना रुग्ण वाढलेले नाहीत. कोरोना रुग्णांची सुरुवात वरळीतून झाली, धारावीत संख्या वाढली. अनेक झोपडपट्ट्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढली. मात्र, चांगल्या वस्त्यांमध्येही ही संख्या वाढली आहे. मुंबईतील असा एकही वार्ड नाही जेथे कोरोना रुग्ण नाही. त्यामुळे हे दावे चुकीचे आहेत. धारावीत रुग्णांची संख्या वाढण्याचं कारण तेथील नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं नाही. विलगीकरणाच्या मोठ्या प्रमाणात ज्या व्यवस्था उभ्या करायच्या होत्या त्या व्यवस्था उभ्या करण्यात आल्या नाहीत, असंही ते म्हणाले.
“देशात होणाऱ्या मृत्यूंपैकी 41 टक्के मृत्यू महाराष्ट्रात”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील आणि मुंबईतील परिस्थिती तुम्ही रोज बघत आहात. महाराष्ट्रात कोरोना वाढतोय. आज आपण बघितलं तर देशात एकूण उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 41 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. याशिवाय कोरोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूंपैकी 41 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. रोज ही संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ आकड्यांचे फेरफार केला जात आहे. काल एका दिवसात 8 हजार रुग्ण डिस्चार्ज झाल्याचं दाखवलं आणि डिस्चार्ज रेट वाढवण्याचा प्रयत्न केला गेला.”
लोक डिस्चार्ज होत असतील याचा आम्हाला आनंद आहे. लोकं चांगली झालीच पाहिजेत. पण, नंबर गेम करण्यापेक्षा आज मुंबईतील लोकांना बेड्स, ऑक्सिजन आणि रुग्णवाहिका मिळत नाही, रस्त्यावर लोकांचा मृत्यू होत आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे यासंदर्भातील कारवाई होणं अपेक्षित आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
संबंधित बातम्या :
कोरोनावर उपचार घेऊन घरी, रहिवाशांकडून टाळ्या वाजवून स्वागत, अवघ्या चार तासात पोलिसाचं निधन
नागपुरात तुकाराम मुंढेंना शिवसेनेची खंबीर साथ, भाजप-काँग्रेसचा मात्र कडाडून विरोध
मुंबईत 24 तासात 192 कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती, सुदैवाने 196 बाळ निगेटिव्ह
संबंधित व्हिडीओ :
Devendra Fadnavis criticize Warli pattern