बर्ड फ्लूचं संकट मोठं, सरकारने व्यावसायिकांना मदत करावी, फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी
बर्ड फ्लूचे हे मोठं संकट आहे. या साथीला थोपवायचे असेल तर वेळीच खबरदरादी घ्यावी लागेल. मोठ्या प्रमाणात कारवाई करावी लागेल, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. (Devendra Fadnavis bird flu)
मुंबई : परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे 800 कोंबड्या मरण पावल्यानंतर आता खबरदारी म्हणून राज्यात अनेक ठिकाणी कोंबड्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर बर्ड फ्लूचे हे मोठं संकट आहे. या साथीला थोपवायचे असेल तर वेळीच खबरदरादी घ्यावी लागेल. मोठ्या प्रमाणात कारवाई करावी लागेल, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तसेच, या आजारामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यांनाही सरकारला मदत करावी लागले असे मत मांडत कुक्कुटपालन करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची फडणवीसांनी मागणी केली. (Devendra Fadnavis said that Bird flu is big crisis, demands help ot poultry farmers)
“बर्ड फ्लू एक मोठं संकट आहे. या साथीला थोपवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात कारवाई करावी लागेल. कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात मदत करावी लागेल,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
रुग्णालयात दुर्घटना झालेल्यांना एकालाही मदत नाही
भंडारा रुग्णालय दुर्घटनेबाबत बोलताना “ज्या बालकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना आजून कोणतीही मदत मिळाली नाही. अजून ऑडिटही झालेले नाही,” असे म्हणत हे सरकार अतिशय टोलवाटोलवी करणारे असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये भंडारा दुर्घटनेवरुन विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच केंद्र सरकारने आरोग्य सेवेच्या बाबतीत माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्याप्रमाणे काम करण्याचा सल्लाही आजच्या सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. त्यावर बोलताना या विषयावर मी काहीही बोलणार नसल्याचे म्हणत राज्यात आरोग्यमंत्री कुणाचे आहेत?, असा खोचक सवाल शिवसेनेला केला.
परभणीतील 80 हजार कोंबड्या मारण्यात : सुनील केदार
परभणीत बर्ड फ्लूमुळे कोंबड्या मेल्याचं आढळून आल्याने परभणीतील 80 हजार कोंबड्या मारण्यात येणार आहे, असं राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं. तसेच राज्यातील 6 जिल्ह्यांना बर्ड फ्लूचा धोका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सुनील केदार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच आम्ही कोंबड्यांचे सँपल भोपाळला पाठवले होते. त्याचा अहवाल आला असून त्यात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत, असं केदार यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
Bird Flu | बर्ड फ्ल्यू माणसांनाही होऊ शकतो, काळजी घ्या; डॉ. अजित रानडे यांचं आवाहन
Bird Flu | दिल्लीनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बर्ड फ्लू, 9 राज्यांत संसर्ग
Bird Flu | संकट वाढले! राज्यातील पाच जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू; प्रशासन अॅलर्ट
(Devendra Fadnavis said that Bird flu is big crisis, demands help ot poultry farmers)