CORONA : शिर्डी, अंबाबाई, सिद्धिविनायक मंदिरातील गर्दी ओसरली

कोरोनाची दहशत वाढत असताना महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांनाही याचा फटका बसत असल्याचे दिसत (Devotees rush decrease in maharashtra temple) आहे.

CORONA : शिर्डी, अंबाबाई, सिद्धिविनायक मंदिरातील गर्दी ओसरली
Follow us
| Updated on: Mar 15, 2020 | 5:24 PM

शिर्डी : कोरोनाची दहशत वाढत असताना महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांनाही याचा फटका बसत असल्याचे दिसत (Devotees rush decrease in maharashtra temple) आहे. महाराष्ट्रातील शिर्डी, कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, अक्कलकोट आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गर्दी ओसरलेली दिसत आहे. दररोज या देवस्थानांना हजारो भाविक भेट देतात. पण यंदा कोरोनाच्या भीतीने मंदिरातील गर्दी ओसरलेली (Devotees rush decrease in maharashtra temple) दिसत आहे.

भाविक येत नसल्यामुळे शिर्डीच्या अर्थकारणाला याचा मोठा फटका बसला आहे. दिवसाला दोन कोटी रुपयांची उलाढाल आता तीस ते चाळीस लाखांवर येऊन ठेपली आहे. तर छोटे मोठे व्यवसायिकांवर मोठी कु-हाड कोसळली आहे. शिर्डी साई संस्थानने भाविकांना दर्शनासाठी गर्दी न करण्याचे आवाहन केलं आहे. तर रामनवमी उत्सवात शेकडो पायी पालख्या शिर्डीला येतात त्या पालखी आयोजकांनी पालखी आणू नये अस पत्र संस्थानने आयोजकांना पाठवलं आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गर्दी ओसरली

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दिवसाला 25 ते 30 हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. पण कोरोनाच्या भीतीमुळे दिवसाला 2 ते 3 हजार भाविक दर्शनासाठी येत आहेत.

सिद्धिविनायक मंदिरातील गर्दी ओसरली

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारने गर्दीच्या ठिकाणी जास्त जमू नका अस आव्हान केलं आहे. मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात दर रविवारी जेवढी गर्दी असते तेवढी गर्दी आज नव्हती भाविकांनी मंदिरात येणं टाळले असल्याचे दिसत आहे.

अक्कलकोट येथील भोजन बंद

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. 16 मार्च ते 31 मार्च 2020 पर्यंत दैनंदिन दोन वेळा दिला जाणारा महाप्रसाद म्हणजे पूर्ण भोजन बसून देण्याचे आता बंद करण्यात आले आहे. पूर्ण भोजनाऐवजी विशिष्ट अंतर ठेवून प्रवाही पद्दतीने भक्तांना रांगेतून पर्यावरण पुरक द्रोणातून शिरा प्रसाद दिला जाणार आहे.

दरम्यान, मंदिर परिसरातील छोट्या-मोठ्या हार, फुलांच्या स्टॉललाही याचा फटका बसला आहे. भाविकांची संख्या कमी झाल्याने स्टॉल धारकांचे नुकसान होत आहे. त्याोसबत शिर्डी, अंबाबाई मंदिरजवळील मोठे हॉटेल, रेस्टॉरंट यांनाही कोरोनाचा फटक बसलेला दिसत आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.