परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना धनंजय मुंडे यांचा दिलासा
'परदेश शिष्यवृत्तीसाठी ज्या शाखेत पदव्युत्तर प्रवेश त्याच शाखेचे पदवी शिक्षण अनिवार्य' हा नियम आता रद्द करण्यात आला आहे
मुंबई : परदेश शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्याच शाखेतून पदवी घेण्याबाबत असलेले बंधन शिथिल करण्यात आले आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. या घोषणेने परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Dhananjay Munde on relaxations about Foreign University Scholarships)
ज्या शाखेतील पदवी आहे, त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल, तरच परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल, हा भाजप सरकारच्या काळात घेण्यात आलेला निर्णय धनंजय मुंडेंनी मागे घेतला. थोडक्यात, एखाद्या विद्यार्थ्यांने आधी घेतलेले पदवी शिक्षण एका शाखेचे असले आणि परदेशी विद्यापीठात त्याला दुसऱ्या शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असेल, तरी त्याला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रात गुगल क्लासरुमचं उद्घाटन, 2.3 कोटी विद्यार्थी-शिक्षकांना लाभ
‘परदेश शिष्यवृत्तीसाठी ज्या शाखेत पदव्युत्तर प्रवेश त्याच शाखेचे पदवी शिक्षण अनिवार्य’ हा नियम आता रद्द करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार परदेशी विद्यापीठाने एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश दिला असेल व त्याचे पदवी शिक्षण अन्य शाखेतून पूर्ण असेल तरीही त्याला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळवता येणार आहे’ असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
“पदव्युत्तरसाठी वयोमर्यादा 35 वर्षे, तर पीएचडीसाठी 40 वर्षे अशीच राहील. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन/ई-मेलद्वारे अर्ज दाखल करावेत. 14 ऑगस्टपर्यंत दिलेली मुदतही वाढवण्यात येईल” असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
परदेश शिष्यवृत्तीसाठी ज्या शाखेत पदव्युत्तर प्रवेश त्याच शाखेचे पदवी शिक्षण अनिवार्य हा नियम आता रद्द करण्यात आला असून नव्या नियमानुसार परदेशी विद्यापीठाने एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश दिला असेल व त्याचे पदवी शिक्षण अन्य शाखेतून पूर्ण असेल (1/2)
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 7, 2020
तरीही त्याला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळवता येणार आहे. वयोमर्यादा पदव्युत्तर साठी ३५ वर्षे व पीएचडी साठी ४० वर्षे अशीच राहील. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन/ई-मेलद्वारे अर्ज दाखल करावेत. १४ ऑगस्ट पर्यंत दिलेली मुदतही वाढविण्यात येईल (2/2)
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 7, 2020
(Dhananjay Munde on relaxations about Foreign University Scholarships)