‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ‘वहिनीसाहेब’ म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे.
काही दिवसांपूर्वी धनश्रीने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.
या गोड बातमीनंतर धनश्रीने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यात ती ‘बेबी बंप’सह छान पोझ देताना दिसली होती.
धनश्रीच्या घरी छोट्या चिमुकल्याचे आगमन झाले आहे.
छान नक्षीदार जरीची साडी नेसलेली धनश्री खुपच मनमोहक दिसतेय. खास करुन यशोदा माता आणि बाळकृष्णाचा फोटो असलेला तिचा ब्लाऊज लक्ष सगळ्यांचे वेधून घेतोय.
फुलांच्या आभूषणामुळे धनश्रीचे सौंदर्य खुलले आहे. पती ध्रुवेश देशमुखसोबतचा धनश्रीचा हा फोटो खुपच गोड दिसतोय.