आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा एल्गार, धनगर नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलनाची हाक
आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार पुकारणार आहे, अशी घोषणा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली. (Dhangar community Protest for Reservation)
मुंबई : सर्वोच्च न्यायलयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाने आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. त्यानंतर आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार पुकारणार आहे, अशी घोषणा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली. महाराष्ट्र सरकारने वेळ द्यावा, मार्ग काढावा, अन्यथा आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका प्रकाश शेंडगे यांनी घेतली आहे. (Dhangar community Protest for Reservation)
धनगर समाजाच्या आंदोलनाला उद्यापासून (21 सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. परभणीत हे आंदोलन केले जाईल. त्यानंतर पुढे प्रत्येक जिल्ह्यात, तालुका पातळीवर आंदोलन करण्यात येईल. महाराष्ट्रातून धनगर समाजाचे नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत.
धनगर समाजाला महाराष्ट्र सरकारने वेळ द्यावा. यातून मार्ग काढावा. अन्यथा आंदोलन सुरूच राहणार, अशी रोखठोक भूमिका प्रकाश शेंडगे यांनी घेतली आहे.
धनगर आरक्षण अध्यादेशाचा निर्णय घ्या – प्रकाश शेंडगे
दरम्यान यापूर्वी धनगर समाजाचा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला नाही तर मोठं जन आंदोलन उभारु, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अद्याप भेटायची वेळ दिलेली नाही. त्यांना भेटूनच धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पुढील वाटचाल ठरवू, असेही प्रकाश शेंडगे यांनी सांगितले होते.
“मराठा आरक्षण मागताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका आहे. यापूर्वीचा 58 मोर्च्यांमध्ये 40 टक्के जनता ही दलित बहुजन होती म्हणून पाठिंबा दिला होता. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. त्यावरचे आरक्षण त्यांनी घ्यावं. जर त्यांना मान्य असेल तर मग आम्ही खांद्याला खांदा देत त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ,” अशी भूमिका प्रकाश शेंडगे यांनी मांडली होती. मात्र आता मराठा आंदोलनानंतर धनगर समाजही आंदोलनात उतरणार आहे. (Dhangar community Protest for Reservation)
संबंधित बातम्या :
धनगर आरक्षण न मिळाल्यास सरकारला सळो की पळो करु, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा
धनगर आरक्षण अध्यादेशाचा निर्णय घ्या, अन्यथा जनआंदोलन उभारु, प्रकाश शेंडगेंचा इशारा