भूमिपूजनादरम्यान #DhanyawadBalasaheb ट्रेन्डिंग, जेव्हा मंदिर-मशिदीच्या प्रश्नावर रोखठोक बाळासाहेबांनी सडेतोड उत्तर दिलं होतं
ट्विटरवर #DhanyawadBalasaheb हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसला. अनेकांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला (Dhanyawad Balasaheb trends on Twitter after Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan)
मुंबई : ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले होते, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राम मंदिर भूमिपूजन सोहळा झाला. यानिमित्ताने ट्विटरवर #DhanyawadBalasaheb हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसला. अनेकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अयोध्येतील राम मंदिर हे बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. (Dhanyawad Balasaheb trends on Twitter after Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan)
शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘आपकी अदालत’ या कार्यक्रमात पत्रकार रजत शर्मा यांनी घेतलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीतील एक मिनिटाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
रजत शर्मा : जेव्हा 6 डिसेंबरला अयोध्येत बाबरी मशिद पाडण्यात आली, तेव्हा शिवसेनेने सर्वात आधी जाऊन झेंडा फडकवला, आणि मोठ्या अभिमानाने जबाबदारी स्वीकारली
बाळासाहेब ठाकरे : अभिमान तर आहेच, बिलकुल. लाज वाटण्यासारखी काही गोष्टच नाही, मी तर आधीच स्पष्ट सांगितलं होतं, की बाबरी मशिद पाडली नाहीये, तर त्याखाली आमचं जे राम मंदिर होतं, ते वर आणलं.
रजत शर्मा : जे अवशेष होते, ते मंदिर होते की मशिद होती?
बाळासाहेब ठाकरे : त्यात अनेक गोष्टी अशा होत्या, ज्यात आमची हिंदू संस्कृती लपली होती
रजत शर्मा : जे पाडले, ते मंदिर होते की मशिद होती बाळासाहेब?
बाळासाहेब ठाकरे : मी तर गेलो नव्हतो. त्यामुळे वर काय होतं, खाली काय होतं, हे मला माहिती नाही. खाली आमचं मंदिर होतं आणि त्यात हिंदू संस्कृतीची प्रतिकं होती.
“गौरव तो है ही।” -हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे#DhanyawadBalasaheb pic.twitter.com/VqRU0VS2RM
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 5, 2020
मंदिराच्या घुमटावर “श्रीराम – बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती” असे लिहिलेला फोटो शिवसेना नेते संजय राऊत यांनी सकाळीच शेअर केला होता. त्याखाली “गर्व से कहो हम हिंदू है” असेही लिहिले आहे. अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन ही बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती असल्याच्या भावना राऊतांनी याआधीही अनेकदा बोलून दाखवल्या आहेत.
#DhanyawadBalasaheb या हॅशटॅगने शेअर झालेले काही ट्वीट
तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान प्रभू श्री राम यांच्या मंदिराचे आज भूमिपूजन झाले. हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे आणि आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. तमाम देशवासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!
|| जय श्री राम || pic.twitter.com/Lk8C8lDV3Z
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 5, 2020
#DhanyawadBalasaheb pic.twitter.com/g6hleaiKDF
— Varun Sardesai (@SardesaiVarun) August 5, 2020
Thank you #BalasahebThackeray pic.twitter.com/6SPHzMleIa
— Anuj Mhatre अनुज म्हात्रे (@anuj_sena) August 5, 2020
This moment is historical. The Aastha of every Hindu. And this moment would be incomplete without these legends #DhanyawadBalasaheb ji #LalKrishnaAdvani ji pic.twitter.com/1ToHBLM9Yl
— Akshat shukla (@Akshats50045358) August 5, 2020
(Dhanyawad Balasaheb trends on Twitter after Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan)