धुळे जिल्ह्याची कोव्हिड 19 लढाईत सर्वोत्कृष्ट कामगिरी, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून अभिनंदन
महाराष्ट्रातील कोव्हिड-19 युद्धात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा जिल्हा म्हणून धुळे पहिल्या स्थानी आलाय. याबद्दल धुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचं तसंच नागरिकांचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अभिनंदन केलं आहे. (Dhule district best performance in the battle of Covid 19)
मुंबई : आरोग्य विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील कोव्हिड-19 युद्धात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा जिल्हा म्हणून धुळे पहिल्या स्थानी आलाय. या जिल्ह्याचे कोरोनामुक्तांचे प्रमाण देखील जवळपास 85 टक्क्यांवर आहे तर कोव्हिड डबलिंग रेटमध्ये सुद्धा धुळे जिल्हा अग्रस्थानी आहे. याबद्दल धुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचं तसंच नागरिकांचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी अभिनंदन केलं आहे. (Dhule district best performance in the battle of Covid 19)
आरोग्य विभागाच्या एकत्रित संकलित अहवालानुसार धुळ्यातल्या कोविडमुक्तांचे (Recovery Rate) प्रमाण 84.22 टक्के इतके असून ते महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रमाण आहे. याशिवाय कोविड डबलिंग रेटमध्ये सुद्धा धुळे जिल्हा महाराष्ट्रात प्रथम आहे.
कोव्हिडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सुरुवातीला 100 टक्के होते मात्र आता यात सुधारणा होऊन हा मृत्यू दर 2.66% इतका खाली आला आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी धुळे आणि मालेगाव येथे कोविड -19 परिस्थितीशी निपटण्यासाठी खास नेमणूक केलेल्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे अभिनंदन केलं आहे तसंच त्यांचे आभार देखील मानले आहेत. कोव्हिड-19 परिस्थिती पाहता, पालकमंत्री सत्तार यांनी धुळे जिल्ह्यासाठी लिक्विड ऑक्सिजन युनिटला मान्यता दिली. तर धुळ्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजय यादव यांच्या नेतृत्चाखाली सर्व टीम काम करीत आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानसुार 23 सप्टेंबर 2020च्या धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात प्रामुख्याने येथील आदिवासी, दुर्बल आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील नागरिक येत असतात. याच रुग्णालयात कोव्हिड-19च्या रुग्णांवरही उपचार करण्यात येत आहेत.
कोव्हिड-19 मध्ये लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा असून धुळेकर जनतेने राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याने कोव्हिड-19 रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. येणाऱ्या काळातही सोशल डिस्टन्सिंग पाळणे, नियमित मास्क वापरणे आणि हातांची स्वच्छता वारंवार करणे या तीन महत्त्वाच्या बाबींचे तंतोतंत पालन सर्वांनीच करणे आवश्यक असल्याचे आवाहन मंत्री अमित देशमुख यांनी केले. (dhule district best performance in the battle of-covid 19 Amit Deshmukh Appriciate Dhule Citizen And health officer)
संबंधित बातम्या
जिल्हा बंदी असताना पुण्यातून परभणीत, जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाला न्यायालयाचा दंड
नागपुरात कोरोनाचा उद्रेक, तरीही नागरिक बेफिकीर, विनामास्क फिरणाऱ्यांकडून 27 लाख रुपयांचा दंड वसूल